आयआयबीएममध्ये एमएमएस पदवीदान समारंभ उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2026
- 11
नवी मुंबई : विश्वेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा येथील इंदिरा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (आयआयबीएम) संस्थेचा मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज 2023-2025 चा पदवीदान समारंभ संस्थेच्या सेमिनार हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाची सुरुवात पारंपरिक पदवीदान मिरवणुकीने झाली. त्यानंतर विश्वेश्वर एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल बिनू वर्गीस यांच्या हस्ते प्रार्थना व मुंबई विद्यापीठ गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. कर्नल डॉ. जेम्स थॉमस यांनी व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेल्या 9 सीएस या नऊ महत्त्वपूर्ण गुणांची संकल्पना स्पष्ट केली. त्याचप्रमाणे आयआयबीएम या संस्थेचे संचालक डॉ. गोविंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिक राहणे, प्रत्येकाचा आदर करणे, निरंतर शिकत राहणे आणि जीवनमूल्ये न विसरण्याचा मूलमंत्र दिला. तर सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल बिनू वर्गीस यांनी वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात करुणा आणि सहानुभूतीचे महत्त्व पटवून दिले. तर सचिव अब्राहम ईसो यांनी आधुनिक तंत्रज्ञान व बदलत्या काळानुसार स्वतला बदलण्याचे आवाहन केले. तसेच सोसायटीचे अध्यक्ष परमश्रद्धेय गीवर्गीस मार कुरिलोस यांनी दयाळूपणा आणि समाजविकासासाठी योगदान देण्याचे महत्त्व विशद केले.
दरम्यान, या समारंभातील प्रमुख आकर्षण म्हणजे पदवीधर विद्यार्थ्यांना पदव्या, प्रमाणपत्रे आणि स्मृतिन्हाचे वितरण करण्यातो. यामध्ये विशेष प्राविण्य मिळवणारे स्पेशलायझेशन टॉपर्स आणि बॅचमधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी यांचा विशेष गौरव करण्यात आला. यानंतर संचालक डॉ. गोविंद शिंदे यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना व्यावसायिक नैतिकता आणि सामाजिक जबाबदाऱ्या जपण्याची शपथ दिली. तसेच आभार प्रदर्शन, वंदे मातरम्, राष्ट्रगीत आणि सामूहिक छायाचित्रणाने या संस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai