Breaking News
भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना
अलिबाग : भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेला (राजिप) चालू आर्थिक वर्षात चार कोटी 11लाख 61हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीपैकी एक कोटी नऊ हजार 570 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. गरोदर महिला, स्तनदा माता व सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालके अशा एकूण 13 हजार 182 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता व बालमृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने आदिवासी विभागाच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयाने भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, पनवेल, रोहा, खालापूर, सुधागड या सहा तालुक्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत आठ प्रकल्प व 283 अंगणवाड्या आहेत. 924 गरोदर महिला, ए हजार 97 स्तनदा माता आणि सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील 11 हजार 161 बालके अशा एकूण 13 हजार 182 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
रायगड जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी चालू आर्थिक वर्षात चार कोटी 11 लाख 61 हजार 500 रुपये निधीची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. यामधील एक कोटी दोन लाख 90 हजार रुपये निधी ऑगस्ट महिन्यापर्यंत दोन टप्प्यांमध्ये प्राप्त झाला होता. उर्वरित निधी प्राप्त व्हावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता त्यानुसार उर्वरित तीन कोटी आठ लाख 71 हजार 500 रुपयांचा निधी सरकारकडून महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीपैकी एक कोटी नऊ हजार 570 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai