जप्त केलेली 150 वाहने मालकांविना पडून

नवी मुंबई ः विविध गुन्ह्यात जप्त केलेली 150 वाहने नेरुळ पोलीस ठाण्यात पडून आहेत. या वाहन मालकांचा सर्वोत्तपरी शोध घेऊनही सदर वाहन मालक कुठेही आढळून आले नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी वाशी न्यायालय यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहिरनामा नवी मुंबई पोलीसांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार वाहन मालकांनी आपले वाहन घेऊन जाण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. पोलीसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने नेरुळ पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. या वाहन मालकांचा शोध पोलीसांनी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे वाशी न्यायालयाने या वाहन मालकांचा शोध घेण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीनाम्यानुसार वाहन मालकांनी योग्य ते कागदपत्र सादर करुन वाहन घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. जर वाहन मालकांनी 6 महिन्यांत वाहने नेले नाही तर ते वाहन बेवारस समजून त्याचा लिलाव करण्यात येणार आहे.