संतोष बनसोडे यांना डॉक्टरेट

नवीन पनवेल : कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाच्या वतीने कळंबोली येथील संतोष दत्तोबा बनसोडे यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. संतोष इंटरपाईजेस संचालक डॉ. संतोष बनसोडे कळंबोली येथे राहत आहेत.

सामाजिक आणि ट्रेनिंग क्षेत्रात कार्य करताना मोटिवेशनल स्पीकर, माईंड मास्टरी, मेमरी मास्टरी एनएलपि ब्रेन अँड माईंड टूल्स टेक्निक अशा अनेक वैज्ञानिक पद्धतीने विद्यार्थी, पालक यांच्या मनाची प्रोग्रामिंग करून त्यांना यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी मार्गदर्शन करणारे डॉक्टर संतोष बनसोडे यांना कॉमन-वेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी-ऑस्ट्रेलिया यांच्याकडून डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. हा सोहळा गोवा येथील हॉटेल हयात सेंट्रिक येथे पार पडला. यावेळी डॉक्टर रिपू रंजन सिंहा (कुलगुरू एशिया), कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया), डॉक्टर जगन्नाथ पटनाईक, कुलगुरू (आयसीएफाय विद्यापीठ सिक्कीम), सुनील बेलगाव (सीएमडी बेळगावी एज्युकेशन), किरण बोंबले, संचालक आदी उपस्थित होते.