राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा ठसा

नुकत्याच जाहीर झालेल्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीनेही आपला ठसा उमटवला आहे. बार्डो, आनंदी गोपाळ, त्रिज्या, पिकासो, खिसा या मराठी चित्रपटांना पुरस्काराने गौेरवण्यात आलं आहे. 

‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपटाची कथा याच चित्रपटाचेच दिग्दर्शक भीमराव मुडे यांची असून पटकथा त्यांच्यासह  श्वेता पेंडसे यांची आहे. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वीच तयार आहे. येत्या काळात तो प्रदर्शित होणार आहे. विशेष बाब अशी की या चित्रपटासाठी गायलेल्या रान पेटलं या चित्रपटासाठी गायिका सावनी रवींद्र या गायिकेलाही सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

याशिवाय, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता याविषयावरील चित्रपटांमध्ये ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘ताजमाल’ या मराठी चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आनंदी गोपाळ हा आनंदीबाई यांच्या जीवनावर बेतलेला चित्रपट होता. या चित्रपटाला लोकाश्रयही चांगला मिळाला. ‘ताजमाल’ या चित्रपटाला नर्गिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर राष्ट्रीय पुरस्कारांत विशेष दखल घेतली गेली आहे ती अभिजीत वारंग याच्या ‘पिकासो’ या चित्रपटाची. या चित्रपटात प्रसाद ओकची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात दशावतार या लोकनाट्यात काम करणार्‍या लोककलावंताच्या जगण्याभवती हा चित्रपट फिरतो. तर ‘लता भगवान करे’ या चित्रकृतीत काम केलेल्या लता करे यांचीही विशेष दखल या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये घेतली गेली आहे.‘जक्कल’ या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. 

उदाहरणार्थ नेमाडे, स्थलपुराण अशा चित्रपटांची निर्मिती करणारा दिग्दर्शक अक्षय इंडिकरच्या ‘त्रिज्या’ या चित्रपटाला साऊंड डिझाईनसाठीही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्रिज्यासाठी मंदार कमलापुरकर या साऊंड डिझायनरला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रपटाचा पुरस्कार ‘अनुरूवड’ या सिनेमाला जाहीर झाला आहे.

विशेष बाब अशी की यंदा राष्ट्रीय पुरस्कारासाठीची जी समिती होती त्याचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं ते एन चंद्रा या दिग्दर्शकाकडे. याशिवाय, कंगना रनौत, मनोज वाजपेयी या कलाकारांनाही सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कोकणी चित्रपट काजरो.. ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ जाहीर झालं आहे. तसेच चित्रपट समीक्षक अशोक राणे यांच्या सिनेमा पाहणारा माणूस या आत्मकथनात्मक पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.  ‘ताकश्ंत फाईल्स’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार ‘कस्तुरी’ या हिंदी सिनेमाला जाहीर झाला आहे.