Breaking News
बबन आणि रौंदळ नंतर भाऊसाहेब पुन्हा एकदा ॲक्शन रुपात झळकणार आहे. भाऊसाहेब शिंदेची मुख्य भूमिका असलेल्या गोवर्धन या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ख्वाडा या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेत सिनेसृष्टीत दाखल झालेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे आता हिंदी रुपेरी पडदा गाजवण्यास सज्ज झाला आहे. बबन आणि रौंदळ नंतर भाऊसाहेब पुन्हा एकदा ॲक्शन रुपात झळकणार आहे. भाऊसाहेब शिंदेची मुख्य भूमिका असलेल्या गोवर्धन या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
बबन या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेबचं रौंदळ चित्रपटामधील ॲक्शन भूमिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. आता भाऊसाहेबची मुख्य भूमिका असलेल्या गोवर्धन या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. भूमिका फिल्म्स ॲण्ड एन्टरटेन्मेंट या बॅनरअंतर्गत बाळासाहेब शिंदे आणि प्रमोद भास्कर चौधरी यांनी गोवर्धन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राईज बिझनेस ग्रुप चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. रौंदळ या बहुचर्चित चित्रपटानंतर भाऊसाहेबचा गोवर्धन हा आगामी ॲक्शनपटही मराठीसह हिंदीतही बनवण्यात येणार असून दिग्दर्शक गजानन नाना पडोळ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. गजानन नाना पडोळ यांनी यापूर्वी रौंदळचे दिग्दर्शन केले होते.
गोवर्धनबाबत भाऊसाहेब म्हणाला की, या चित्रपटात पुन्हा एकदा ॲक्शन रूपात दिसणार असलो तरी हा विषय खूप वेगळा आणि संवेदनशील आहे. तुमच्या आमच्या रोजच्या सामाजिक जीवनातील मुद्दे या चित्रपटात मोठ्या धाडसाने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भाऊसाहेबने सांगितले. देशातील भयाण वास्तव रुपेरी पडद्यावर सादर करत समाजाला आरसा दाखवण्याचं कामही हा चित्रपट करेल यात शंका नाही. हिंदू धर्मात गायीला माता मानली जाते. तिच्या ठायी तेहतीस कोटी देवांचं वास करत असल्याचं मानलं जातं. त्याच गोमातेच्या रक्षणार्थ उभ्या ठाकलेल्या नायकाची कथा गोवर्धनमध्ये आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai