"मिस यू" चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 10, 2024
- 526
अभिनेता सिद्धार्थ आता पुन्हा एकदा रोमँटिक चित्रपटात झळकणार आहे. सिद्धार्थची मुख्य भूमिका असलेला मिस यू चित्रपटाचा फर्स्ट लूक आउट झाला आहे. रोमँटिक हिरो आर. माधवनने या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले. सिद्धार्थ बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा रोमँटिक हिरोच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांना या चित्रपटाची प्रतिक्षा लागली आहे. सिद्धार्थ हा "इंडियन-2" मध्ये ही झळकणार असल्याचे वृत्त आहे.
सिद्धार्थ आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी "मिस यू" चे नवीन पोस्टर आऊट केले. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ एका मोठ्या बॅकपॅकसह प्रवासाला जात असल्याचे दिसत आहे. या पोस्टरवरून चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न चाहते करत आहेत.
अभिनेता आर. माधवन याने सोशल मीडियावर मिस यूचे पोस्टर शेअर करताना आनंद व्यक्त केला. माधवनने म्हटले की, माझा भाऊ सिद्धार्थ मोठ्या कालावधीनंतर पु्हा एकदा लव्ह स्टोरीमध्ये काम करताना दिसणार आहे. सिद्धार्थला रोमँटिक हिरोच्या भूमिकेत पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील असेही माधवनने म्हटले.
विक्रम'आणि लिओ चा दिग्दर्शक लोकेश कनागराजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स'वर "मिस यू" चे फर्स्ट लुक पोस्टर शेअर केले आहे. चे पोस्टर लाँच करताना आनंद वाटत असल्याचे त्याने म्हटले. सिद्धार्थ आणि चित्रपटाच्या सगळ्या टीमला कनागराजने शुभेच्छा दिल्या आहेत.
मिस यू चे दिग्दर्शन एन राजसेकर यांनी केले आहे. चित्रपटाचे संगीत घिब्रान यांनी दिले असून केजी वेंटाटेश सिनेमॅटोग्राफी सांभाळणार आहेत. या चित्रपटात सिद्धार्थसह अशिका रंगनाथ, बाला सरवान, लोल्लू साभा मारन, करुणाकरन आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai