नैनीतालमध्ये पार पडला ‘असंभव’ चा मुहूर्त
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 11, 2025
- 872
मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘असंभव’ ह्या त्यांच्या आगामी चित्रपटाताचा मुहूर्त नुकताच नैनीताल येथे पार पडला. हा चित्रपट येत्या 1 मे 2025 ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार असून नितीन प्रकाश वैद्य, सचित पाटील यांची मुंबई-पुणे एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस ह्या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच ‘असंभव’ या आगामी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आल्या आहेत.
वळू, नाळ, गच्ची, अलिबाबा आणि चाळीशीतले चोर ते लाईक आणि सबस्क्राईब अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ या सिनेमाला लाभणार आहे. ‘क्षणभर विश्रांती’ आणि ‘साडे माडे तीन’ या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर सचित पाटील निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. तसेच निर्माते शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा नाच गं घुमा हा सिनेमा महाराष्ट्रभर गाजला होता त्यामूळे या आगामी सिनेमाकडून देखिल प्रेक्षकांना अपेक्षा आहेत. हाय काय नाय का, उबुंटू या सिनेमानंतर आता दिग्दर्शक, अभिनेते पुष्कर श्रोत्री असंभव या सिनेमाचं देखिल दिग्दर्शन करत आहेत.
इतक्या ताकदवर कलाकारांना एकत्र आणणारा ‘असंभव’ हा चित्रपट रहस्यपट आहे की थरारपट? ही पूर्णतः नवीन विषयावरची कलाकृतीं आहे की एखाद्या जुन्याच विषयाशी याचे धागेदोरे जुळतायेत? या सगळया प्रश्नांच्या उत्तरांसह या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai