ऐरोली-घणसोली दरम्यान उड्डाणपुल उभारणार
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2021
- 684
बारा वर्षानंतर वाहतुक कोंडी सुटणार; खासदार विचारे यांच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई ः नवी मुंबईत होणार्या वाढत्या शहरीकरणामुळे वाहतुक कोंडीच्या समस्यांनी येथील नागरीकांची पुरती दमछाक झाली आहे. यासाठी घणसोली-ऐरोली जोडरस्त्यावर 372 कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्याच्या जोडरस्त्याची लांबी 3.4 कि.मी. असेल तर जोड उड्डाणपुलाची लांबी 1.06 कि.मी. असणार आहे. हा उड्डाणपूल ऐरोली-मुलुंड, काटईला जोडला जाणार असल्यामुळे तब्बल बारा वर्षानंतर नवी मुंबईची वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.
वाहतुक कोंडीचे निराकरण करण्यासाठी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी 29 मे 2018 रोजी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून पाठपुरावा केला आहे. येथील पर्यायी रस्त्याची लागणारी आवश्यकता लक्षात घेता विचारे यांनी गेल्या बारा वर्षांपासून अपूर्णावस्थेत असलेल्या घणसोली-ऐरोली जोडरस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला गती देण्यासाठी 24 डिसेंबर 2020 रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सदर काम गतीमान झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने जुन्या प्रस्तावाप्रमाणे 1.94 किलोमीटर असलेला पूल 3.2 किलोमीटर लांबीचा प्रस्ताव बनवून सदर पूल मुलुंड-ऐरोली टोल मार्गावरच्या ऐरोली-कटाई या पुलाला जोडण्याचा प्रस्थापित केला आहे. या पुलासाठी 372 कोटी रक्कम खर्च अपेक्षित आहे. हा प्रादेशिक नवीन लिंक मार्ग होणार आहे. नवी मुंबईतील वाहतूककोंडी फुटणार असून याचा फायदा मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील प्रवाशांनाही होणार आहे.
अंतिम टप्प्यातील पर्यावरण विभागाच्या परवानगी मिळण्याच्या प्रतिक्षेत असून याची पाहणी गुरुवारी खासदार राजन विचारे यांनी अधिकार्यांच्या समवेत केली. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, सिडकोचे मुख्य अभियंता डायटकर, कांदळवनाचे ए सी एफ राजेंद्र मकदूम, उप मुख्य वनसंरक्षक अधिकारी गजेंद्र हिरे, कार्यकारी अभियंता संजय देसाई, अरविंद शिंदे, तसेच जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, विरोधीपक्ष नेते विजय चौगुले, उपजिल्हा प्रमुख मनोज हळदणकर, अतुल कुलकर्णी, शहर प्रमुख विजय माने,उप शहर प्रमुख अनिल पाटील आदी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai