माजी आमदार संदीप नाईक यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

नवी मुंबई ः ऐरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संदीप नाईक यांनी रविवारी कोरोना लसीचा पाहिला डोस घेतला. यावेळी त्यांनी लसीकरणासाठी पात्र सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले.

1 मे 2021 पासून देशात 18 ते 44 वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले. संदीप नाईक यांनी कोविन पोर्टलवर  आपली रितसर नोंदणी केली. कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणीची प्रक्रीया अत्यंत सोपी आहे. या पोर्टलद्वारे मिळालेला दिनांक आणि वेळेनुसार आज त्यांनी नेरूळच्या माता बाल रूग्णालयस्थित लसीकरण केंद्रांवर जावून स्वतःचे लसीकरण करून घेतले. कोविड 19चे निर्मुलन करण्यासाठी अवघा देश एकजुटीने आणि जबाबदारीच्या भावनेने युध्दस्तरावर प्रयत्न करतो आहे. नागरिकांना कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकारं प्रयत्नशील आहेत. अशा वेळेस आपल्या सर्वांचे हे सर्वोच्च कर्तव्य आहे की कोरोनाची लस वेळेवर घेवून आपण स्वतःला सुरक्षित करून घ्यावं. जेवढया मोठया संख्येने लसीकरण होणार आहे तेवढाच या महामारीचा आपल्या देशातील धोका कमी-कमी होत जाणार आहे. कोरोनाविरोधाच्या लढण्यात भारतीय लसी अत्यंत प्रभावशाली असून प्रत्येकाने निर्धास्तपणे त्या घ्याव्यात, असेही संदीप नाईक यावेळी म्हणाले.