पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


साहेब तेरी गंगा मैली हो गई....

युपी आणि बिहार मध्ये कोरोनाने थैमान मांडले आहे. दोन्ही राज्यात कोरोनाने गावागावात हातपाय पसरल्याने मृत्यूचे तांडव या दोन्ही राज्यात पाहायला मिळत आहे. आधीच भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीने ग्रासलेल्या या राज्यांतील प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघताना दररोज पाहायला मिळत आहेत. मृत्यूच्या आकड्यांची लपवाछपवी करण्यात अनेक राज्ये आघाडीवर असून सरकारी आकडे आणि प्रसारमाध्यमांतून मिळणारे आकडे यांत खूपच तफावत आहे. आता तर या संक्रमण काळात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी लाकडे उपलब्ध होत नसल्याने प्रेतांना नदीत  सोडून देण्यात येत आहेत तर काहींना किनारी वाळूतच गाडले जात आहे. कोरोना संक्रमणात केंद्रसरकारची सामाजिक आणि  प्रशासकीय अनास्था पाहिल्यावर मोदी सरकार संक्रमण हाताळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. गंगा नदीचे आणि तिच्या काठाचे भयंकर विदारक दृश्य पाहून गुजराथी कवयित्री पारुल खक्कर यांनी या परिस्थितीचे यथार्थ वर्णन करणारी ‘मेरा साहेब नंगा’ हि कविता सामाजिक माध्यमावर प्रसिद्ध केली आहे. राजकपूर यांच्या सिनेमातील ‘राम तेरी गंगा मैली हो गयी, पापीयोंके पाप धोते-धोते’   या गाण्याच्या ओळी मोदी सरकारच्या संक्रमण काळातील कारभाराला चपखल बसतात.

कोरोना संक्रमणाची पहिली लाट भारत सरकारने कशीबशी परतवून लावली. पण त्याच वेळी जगात निरनिराळ्या देशात येणार्‍या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेकडे मोदी सरकारने अक्ष्यम्यपणे दुर्लक्ष केले आणि देशात निवडणुकीचा उत्सव साजरा केला. भारताने कोरोनावर विजय मिळवला म्हणून स्वतःची पाठ मंत्रिमंडळातील आपल्या सहकार्‍यांकडून थोपटून घेतली शिवाय आंतराष्ट्रीय मंचांवरही भारताने कोरोनावर कसा विजय मिळवला याच्या गमजा मारल्या. या अनावश्यक केलेल्या बढाईने मोदी साहेब आता आंतरराष्ट्रीय मंचावर पुरते उघडे पडले आहेत. आंतरराष्ट्रीय मीडिया हा विकलेला नसल्याने त्यांनी मोदींच्या कारभाराची पिसे काढायला सुरुवात केली असून भारतीय मीडिया मात्र अजूनही मोदींवर स्तुतीसुमने उधळण्यात व्यस्त आहे. भारतीय मीडियाच्या उधळणार्‍या स्तुतिसुमनांवर भक्त मात्र बेहोद खुश असून त्यांना देशात दररोज मरणार्‍या हजारो आपल्या देशबंधूंशी काहीही देणंघेणं नाही याची जाणीव त्यांच्या प्रसार माध्यमांवरील प्रतिक्रियेने होते. ज्या हिंदुत्वाच्या आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हे भक्त मोदींच्या विचारांशी कटिबद्धता दाखवतात त्याच देशातील हजारो हिंदूंच्या मरणाशी यांना सोयरसुतक नसणे हे अमानवीयतेचे लक्षण असून त्याचा खर्‍या प्राचीन हिंदुत्वाशी कोणताही दुरान्वये संबंध नाही. मग हे भक्त या देशावर कोणते हिंदुत्व लादू पाहत आहेत याचा विचार करण्याची वेळ आता देशातील नागरिकांवर आली आहे.

उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि गुजरात या चार भाजप प्रणित राज्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरु आहे. तसे पहिले तर कोरोनाच्या संक्रमणाने संपूर्ण देशाला आता कवेत घेतले आहे. शहरी भागातून कोरोना आता ग्रामीण भागात पसरला आहे. गावोगावी कोणतीही आरोग्याची साधने नसल्याने विना उपचार लोक मरत असल्याच्या बातम्या पाहून मन विषन्न होते. शहरी भागात आरोग्याच्या साधनसामुग्रीची प्रचंड कमतरता जाणवत असताना, एकेका ऑक्सिजन सिलिंडरसाठी लोक पहाटे पासून रांग लावीत असून 2000 रुपयांच्या रेमडेसवीरसाठी 40000 हजार मोजत असताना गावखेड्यात त्याची काय परिस्थिती असेल याची कल्पनाच करवत नाही. कोरोना चाचणीची कोणतीही साधने खेडोपाडी नसल्याने घराघरात खोकला-तापाने लोक संक्रमित असून झोलाछाप डॉक्टरांच्या माध्यमातून उपचार करून घेत आहेत. देशात रामराज्य स्थापन करण्याचे वचन देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार देशाच्या आरोग्यसेवेचा कारभार रामभरोसेच करत आहे आणि त्यास सर्वोच्य न्यायालपासून उच्च न्यायालयानेही दुजोरा दिला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे देशाला लाभलेले  सर्वात निष्क्रिय मंत्री आहेत. मोदी सरकारचे मंत्री जमिनस्तरावर काम करण्यापेक्षा ट्विटर वरूनच टिवटिव करताना दिसतात. गेल्या दोन महिन्यात आपत्तीच्या परिस्थितीत या मंत्र्यांचे दर्शन  क्वचितच देशवासियांना झालेले पाहायला मिळत असून देशात हर्षवर्धन यांनी आरोग्यसेवेचा आढावा घेण्यासाठी कोठेही फेरफटका मारला नाही. गेल्या नोव्हेंबरपासून देशातील तज्ज्ञांनी तसेच स्थायी समितीने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची जाणीव मोदी सरकारला करून दिलेली असतानाही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्‍या सरकारवर खरतर नरसंहाराचा खटला दाखल करणे आवश्यक आहे. परंतु आज देशातील सर्वच स्वायत्त संस्था ह्या मोदींच्या इशार्‍यावरूनच काम करत असल्याचा आरोप होत असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हाही प्रश्न देशवासीयांपुढे आहे.

नोव्हेंबरमध्ये बिहार राज्याची निवडणूक, जानेवारीपासून उत्तरप्रदेशातील ग्रामपंचातींच्या निवडणुका आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीने कोरोनाला देशात पसरण्याची नामी संधी मिळाली. लाखोंच्या सभा घेणार्‍या मोदी-शहा जोडगोळीने विना मास्क प्रचार केल्याची चित्रफीत प्रसारमाध्यमांवर असताना कोणतीही कारवाई निवडणूक आयोगाने राजकर्त्यांवर केली नाही यातच मोदींचा निवडणूक आयोगावर असलेल्या प्रभावाची जाणीव होते. कालच उत्तरप्रदेशमधील पंचायत निवडणुकीत 1621 शिक्षकांचा मृत्यू झाल्याची यादी तेथील शिक्षक संघटनेने जाहीर केली आहे. योगी सरकारने लागोलाग तीनच शिक्षकांचा मृत्यू झाल्याचा खुलासा करून त्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीपासून उत्तरप्रदेशातील शिक्षक संघटना या निवडणूक पुढे ढकलाव्यात म्हणून सरकारला वारंवार विनंती करत असतानाही उत्तरप्रदेशात निवडणूक घेणार्‍या निवडणूक आयोगावरच गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. आज 1600 घरांमधील कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री मृत्युमुखी झाल्याने केवढेमोठे संकट त्या परिवारावर आले आहे याची कल्पनाच न केलेली बरी. हीच परिस्थिती अन्य राज्यातील निवडणूक कर्मचार्‍यांबद्दल आहे. अनेकजण कोरोनाच्या संक्रमणाने बाधित झाले असून साहेबांच्या सत्तालालसेचे ते शिकार ठरले आहेत. देशातील निवडणुका कोरोना संक्रमणामुळे पुढील वर्षभर टाळणे शक्य असताना लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलणार्‍या निवडणूक आयोगावर जनहित याचिकेद्वारे न्यायालयास कारवाई करण्यास भाग पडणे गरजेचे आहे तरच अशा संस्थांची स्वायत्तता भविष्यात आबाधित राहील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोरोना प्रसारक म्हणून हिणवणी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे.   देशाच्या आरोग्य सेवेचा विस्तार करणे गरजेचे होते त्यावेळी साहेब देशाच्या कानाकोपर्‍यात निवडणूक प्रचारात व्यस्त होते. संपूर्ण जग जेव्हा त्यांच्या नागरिकांच्या लसीकरणाची तयारी करत होते तेव्हा साहेब कोरोनावर विजय मिळवला म्हणून स्वतःवरच स्तुतीसुमने उधळण्यात व्यस्त होते. देशाची लोकसंख्या 130 कोटी असताना फक्त 1.50 कोटी लसींची ऑर्डर सीरमला देऊन लसीकरणाचा उत्सव साजरा करण्यात धन्यता मानत होते. कोरोना लढ्याला ज्यावेळी प्राधान्य देणे गरजेचे आहे तेव्हा साहेब 20 हजार कोटींच्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट उभारण्यात व्यस्त आहेत. मोदींनी जर गावोगावी छोटे छोटे नागरी आरोग्य केंद्रे उभारण्याची दूरदृष्टी दाखवली असती तर आज मृत्यूच्या तांडवाला देशवासियांना सामोरे जावे लागले नसते. या लढ्याचे नेतृत्व महामारीतज्ज्ञांकडे देऊन त्यांच्या माध्यमातून निर्णय घेतले असते तर देशातील चित्र वेगळे असते. परंतु आपल्याला सर्वातील सर्वकाही कळते या अभिवेशात या संक्रमणाला देशाचे नेतृत्व सामोरे गेल्याने हि भयाण परिस्थिती देशवासीयांवर ओढवली आहे. ‘मा गंगा ने मुझे बुलाया है’ म्हणून वाराणसीचे प्रतिनिधित्व करणार्‍या मोदींच्या मतदार संघाची अवस्था बिकट आहे. स्वतः गंगा प्रेतांनी दुथडी भरून वाहत आहे तर घाटावर अविरत प्रेताग्नी धगधगत आहे. गंगा किनार्‍यांवर हजारो प्रेतांना दफन करण्यात आले आहे. हे सगळे दृश्य पाहून गुजरातच्या कवयित्रीने ‘मेरा साहेब नंगा’ हि ह्रदयविदारक कविता लिहिली आहे. मागील सरकारची पापे धुण्यासाठी निवडलेल्या मोदींच्या कर्तुत्वाला पाहून ‘साहेब  तेरी गंगा मैली हो गयी’ म्हणायची वेळ देशवासीयांवर आज आली आहे.    

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट