आयसीयूमधील कोव्हिडबाधीतांच्या उपचारांबाबत डॉक्टरांचा वेबसंवाद
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 08, 2021
- 421
नवी मुंबई ः कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोव्हीड बाधीतांची ऑक्सिजन पातळी खालावून त्यांना आयसीयू व व्हेन्टिलेटर्सची गरज भासण्याचे प्रमाण अधिक होते. त्या अनुषंगाने कोव्हीडच्या संभाव्य तिसर्या लाटेची पूर्वतयारी सुरु असताना महानगरपालिकेकडे उपलब्ध डॉक्टर व नर्सेस यांना आयसीयू मधील कोव्हीडबाधीत रुग्णांवरील उपचारांबाबत प्रशिक्षण मिळावे यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार वेबिनारव्दारे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये नामांकित फिजिशियन तथा क्रिटिकल केअर मेडिसिन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अक्षय छल्लानी यांनी महानगरपालिकेच्या कोव्हीड केंद्रातील 300 हून अधिक वैद्यकीय अधिकार्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे सहभागी होत्या.
आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या कोव्हिडबाधीत रूग्णांसाठीच्या क्लिनीकल प्रोटोकॉलबाबत सविस्तर माहिती देत डॉ. अक्षय छल्लानी यांनी सादरीकरणाव्दारे विविध वैद्यकीय बाबींविषयी विस्तृत माहिती दिली त्याचप्रमाणे सहभागी डॉक्टर्सच्या शंकांचे सविस्तर निरसनही केले. डॉक्टरांनी उपचार करताना आपण कोव्हीड बाधीतांवर उपचार करीत आहोत याची जाणीव ठेवून कोव्हीड लसीकरण झाले असले तरीही पीपीई कीट, फेस शील्डसह इतर सर्व आवश्यक सुरक्षा साधनांचा उपयोग करावा असे डॉ. अक्षय छल्लानी यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे उपचारामध्ये योग्य वेळी योग्य औषध या सूत्राचे काटेकोर पालन करावे असेही त्यांनी सूचित केले. कोव्हीडमधून बरे झाल्यानंतर विशेषत्वाने मधुमेह, किडनीचे विकार असलेल्या काही रूग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याचे लक्षात घेऊन उपचारामध्ये स्टिरॉईडचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, आयसीयू कक्ष व्यवस्थापनातील अत्यंत छोट्या बाबींबाबतही डॉ. अक्षय छल्लानी यांनी बारकाईने मुद्देसुद माहिती दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai