हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे ऑनलाईन वर्ग सुरू

नवी मुंबई : अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या वाशी येथील शाखेत ऑनलाईन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नृत्य, गायन, वादन वर्ग जुन महिन्यापासून सुरू करण्यातआले असल्याचे संस्थेने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

 संगीताचा प्रसार, प्रचारासाठी सन-1931 मध्ये सुरू करण्यात आलेल्या अखिल भारतीय गर्धव महाविद्यालयाची वाशी येथे सन-1988 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या शाखेमार्फत शास्त्रीय संगीत सोबत नृतचे शिक्षण दिले जाते गेल्या वर्षीभरापासुन सुरू असलेला करोनाचा संसर्ग पाहता विध्यार्थी यांच्या सुरक्षेते दृष्टीने ऑनलाईन वर्ग सुरू करण्यासाठी विचार केला जात होता जुन 2021 पासुन, ऑनलाईन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, गायन, वादन आणि नृत शिक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी अल्प शुल्कसह प्रवेश घेणार्‍याचे वय-8 वर्ष पूर्ण,महाविद्यालयाच्या अभ्यासक्रम नुसार शिक्षण देणे, आठवड्यात 2 वर्ग दोन तासाचे असतील.