Breaking News
रफिज फॅन क्लब मुंबई ही संस्था गेली सतत 8 वर्षे विविध संगीताचे उपक्रम राबवून नवीन कलाकारांना मानाचं व्यासपीठ देत आलेली आहे. मग ते कराओके कार्यक्रम असो वा वाद्यवृंदाचा संगीत कार्यक्रम असो वा थिएटरमध्ये मोठ्या संगीत मैफिली असो. हे असे सर्व प्रकारचे कार्यक्रम एकमेव रफिज फॅन क्लब मुंबई ही संस्था केवळ सर्व वयोगटातील नवीन उभरत्या गायकांसाठी सातत्याने राबवत आलेली आहे.
सुनील नारायण वाडकर हे ह्या ठऋउच् चे सर्वेसर्वा आहेत. त्यांना त्यांच्या ‘इंजिनीयर ते गायक’ ह्या खडतर प्रवासातून आलेल्या अनुभवातून त्यांनी नवीन मेहनती गायकांना पुढे आणण्याचा दृढ निश्चय केला आणि ह्या निश्चयाला सतत जागं राहून गेली 8 वर्षे ते ह्या संगीत क्षेत्रात नवीन होतकरू गायकांसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यासाठी ‘ठऋउच’ ही संस्था उभरत्या गायकांसाठी एक नवीन प्रकल्प राबवित आहे तो म्हणजे ह्या गायकांना येणार्या काळात मुंबईतील मुख्य 7 मोठ्या थिएटर्स मध्ये (अंधेरी, दादर, बोरिवली, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, नवी मुंबई) प्रदर्शित करण्याचा मानस केला आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईतील गायकांना ह्यात भाग घेणं सोयीस्कर होऊन त्यांना मुंबईतील थिएटर्स मध्ये प्रेक्षकांसमोर आपला ठसा उमटवण्याची संधी मिळणार आहे. तत्पूर्वी नवीन गायकांतील व्यासपीठावरचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवरच्या छोट्या थिएटर्स मध्ये सराव संगीत कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ह्या सराव संगीत कार्यक्रमाची सुरुवात येत्या 24 जुलै 2021 पासून वाशी नवी मुंबईतील साहित्य कला सभागृहातून होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai