रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी

पनवेल : कामोठे वसाहतीत महानगर गॅस कंपनीने रस्ते खोदुन लाईन टाकल्या मात्र त्यासाठी खोदलेले रस्ते तसेच ठेवले आहेत. ते बुजविण्याची मागणी जय हरी महिला मंडल कामोठे आणि कामोठे रहिवासी सामाजिक संस्था यांनी केली आहे.

कामोठे सेक्टर 8, एम एन आर शाळा सेक्टर 6 व 8 मधील रोड शंकर मंदीर चौक, सेक्टर 5 व 9 मधील रोड दत्तुशेठ पाटील विदयालय ते रामशेठ ठाकुर विद्यालय ह्या ठिकाणी महानगर गॅस कंपनीने रस्ते खोदुन लाईन टाकल्या आहेत. मात्र नंतर खोदलेले रस्ते पुर्ववत करण्याचा विसर संबंधित प्राधिकरणाला पडला आहे. तसेच रस्त्यावरील पथदिवे सुध्दा अनेक दिवसांपासुन बंद आहेत याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. तसेच मानसरोवर स्टेशन रोडवरील पथदिवेही बंद असल्याने सध्या पावसाळ्यात रात्रीच्यावेळी महिलांना व इतर प्रवाशांना चाचपडत रस्ता शोधावा लागत आहे. ही सर्व कामे संबंधित प्राधिकरणांनी त्वरील पुर्ण करावीत अशी मागणी जोर धरु लागली आहे. अन्यथा आंदोलन करावे लागेल अशा इशारा जय हरी महिला मंडल कामोठे यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.