सुडबुद्धिने होणारी कारवाई थांबवावी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 03, 2021
- 531
ठाण्याच्या आयुक्तांना निवेदन ; सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
पनवेल : दि.बा.पाटील यांच्या नावासाठी आग्रह केला म्हणून आगरी-कोळी बांधवांच्या घरे, बांधकामांवर सुडबुद्धीने कारवाई सुरू आहे. ती कारवाई तात्काळ थांबवण्याची सर्वपक्षीय कृती समितीनं मागणी केली. रामशेठ ठाकूर आणि कृती समितीने ठाण्याचे महापौर आणि आयुक्तांना याबाबत निवेदनही दिले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा.पाटलांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी करण्यात आलेल्या घेराव आंदोलनावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर ठाण्यातील आगरी-कोळी बांधवांच्या घरे, बांधकामांवर तेथील महापालिकेने सूडबुद्धीने कारवाई सुरू केली. पाडकामाची ही कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकार्यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त विपीन शर्मा यांची सोमवारी भेट घेऊन त्यांच्याकडे केली.
या वेळी कृती समितीच्या पदाधिकार्यांनी सांगितले की, विकास आणि औद्योगिकीकरणाच्या नावाखाली ठाणे महानगरपालिका हद्दीतील भूमिपुत्रांच्या जमीन अल्प दरात घेऊन तेथे कंपन्या, टाऊन्स उभी राहिलेली आहेत. मात्र स्थानिकांचा गावठाण विस्ताराचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. सध्या स्थानिकांना शेती नाही, घरे नाही, नोकरी नाही, व्यवसाय नाही. अशी परिस्थिती असताना केवळ लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने आकसापोटी येथील आगरी-कोळी लोकांच्या घरांवर ती अनधिकृत आहेत, असे सांगून महापालिका कारवाई करीत आहे, असंही कृती समितीनं सांगितले.
बेकायदा बांधकामांना आमचा पाठिंबा नाही, पण ठाण्यात अशी अनेक अनधिकृत बांधकामे आढळून येतात. त्यांना मात्र अभय दिले जाते. एवढेच नव्हे तर काही बड्या मंडळींची अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित केली जातात. मग एकाला एक न्याय आणि दुसर्याला वेगळा असे का? जाणीवपूर्वक सुडबुद्धीने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे, असा आरोपही कृती समितीनं केला आहे. तसेच 9 तारखेला गावागावात निदर्शने करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai