वरी व नाचणी पिकावरील प्रक्रिया उद्योगाची संधी
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 22, 2021
- 580
अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे : केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यासाठी नाचणी, वरी या पिकावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त वैयक्तिक, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था यांनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले आहे.
प्रक्रिया उद्योगात अनेक असंघटीत अनोंदणीकृत कृषि व अन्न प्रक्रिया उद्योग आहेत. या असंघटीत अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक अडचणी आहेत (उदा. कर्ज मिळणे व पात्र न होणे, आधुनिकीकरणाचा अभाव, एकात्मिक अन्न साखळीचा अभाव, आरोग्य व सुरक्षितता मानांकनाचा अभाव ईत्यादी). या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची घोषणा केली आहे. ही योजना राज्यातही राबविण्यात येत आहे. या योजनेत सध्या कार्यरत असलेले तसेच नाचणी, वरी उत्पादनांवर आधारित वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट /संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पदक संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतशील शेतकरी इत्यादी भाग घेऊ शकतात. योजने अंतर्गत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगाला / उपक्रमांना एकूण प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 10 लाखपर्यंत क्रेडीट लिंक सबसिडी आधारावर अनुदानाचा लाभ मिळणार. तसेच लाभार्थीची गुंतवणुक किमान 10 टक्के आवश्यक असून उर्वरीत रक्कम बँक कर्ज घेण्यास मुभा आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करणे सुरु झाले आहे. जिल्ह्यातील उत्सुक वैयक्तिक, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 9403016837, 9769586526, 9404951064 वर संपर्क करावा.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai