305 कोटींच्या विविध विकासकामांना मंजुरी
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 25, 2021
- 410
पनवेल : पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा विकासकामांचा झंझावात शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत 305 कोटी रुपयांच्या विकासकामांना दिलेल्या मंजुरीवरून दिसून आले. यामध्ये पालिका क्षेत्रातील उद्याने, गार्डन, वऑकिंग ट्रक, जिम यांचा समावेश असून 280 कोटींच्या पालिका मुख्यालय इमारतीचाही समावेश आहे.
24 सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली व नवीन पनवेल या ठिकाणी 06 प्ले ग्राऊंड, 15 उद्याने विकसित करण्यासाठी 27 कोटी 25 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली. हे सर्व विकसित करीत असताना या ठिकाणी सोयीसुविधांयुक्त प्ले ग्राऊंड व उद्याने मिळणार आहेत. त्यामध्ये युवकांना खेळण्यासाठी बॅडमिंटन, लॉन टेनिस, क्रिकेट, बास्केटबॉल, हॉलीबॉल, स्केटिंग, लहान मुलांसाठी किड्स प्ले (खेळांचे साहित्य), तसेच ज्येष्ठ नागरिकांनासाठी विरुंगळा केंद्र, वॉकिंग ट्रॅक, तसेच ओपन जिमचा समावेश असणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या सुलभ कामकाजाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अशा अद्ययावत मुख्यालयाची आवश्यकता आहे त्याकरिता नवीन पनवेल (पश्चिम) येथील भूखंड क्रमांक 4 सेक्टर 16, क्षेत्रफळ 20086 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड सिडको कडून प्राप्त झाला आहे. या भूखंडाकरिता महापालिकेने 25 कोटी 54 लाख 72 हजार 701 रुपये सिडकोला अदा केले असून सदर भूखंड पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच या करिता वास्तू विशारद सल्लागार म्हणून मी. हितेन सेठी यांची जाहीर स्पर्धात्मक निविदा मागवून सर्वात उत्कृष्ट व न्यूनतम दरास 09 सप्टेंबर 2020 रोजी स्थायी समितीच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेची प्रस्तावित इमारत हि तळघर, तळमजला, सहा मजले व सहावा वरचा मजला, तसेच टेरेसवर आर्ट गॅलरी अशी एकूण 25415 .76 एवढे क्षेत्र आहे. या भव्य अशा इमारतीस ढोबळ खर्च 280 कोटी रुपये अपेक्षित आहे. यापैकी सदर कामाच्या अंदाज पत्रकाच्या दृष्टीने व आर्थिक उपलब्धतेनुसार काम करण्याच्या दृष्टीने दोन टप्प्यांमध्ये निविदा मागविण्यात येणार आहे. त्याप्रमाणे प्रथम टप्प्यांमध्ये इमारतीच्या बांधकामाचा अंदाजित खर्च रक्कम 137 कोटी रुपये आहे. दुसर्या टप्प्यात इंटीरियर वर्क, फर्निचर, लँड स्केपिंग, महासभागृहातील ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीम व इतर सुविधा या बाबींचा अंदाजित खर्च 143 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रमाणे महासभेने प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिली असून लवकरच पहिल्या टप्प्यातील निविदा प्रसिद्ध होणार आहे.
शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास करणे हा उद्दिष्ट ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासन काम करीत आहे. नागरिकांना अभिप्रेत असलेला पनवेल महानगरपालिका हद्दीतील विकास अल्पावधीतच वेगवान ठरला आहे, त्यामुळे विकासाचा महामेरू कायम राहून पनवेल महानगरपालिका येत्या काळात राज्यातील उत्कृष्ट महानगरपालिका ठरेल. पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प साकार होत असताना ग्रामीण भागातही स्मार्ट व्हिलेज योजना राबविण्यात येत आहे, त्यामुळे शहरांसोबत गावांचाही विकास साधला जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai