खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


राजकारणातील अभिनेता...

राजकारण आणि अभिनयक्षेत्र  याचे हजारो वर्षांपासूनचे नाते आहे. पूर्वी राजे-महाराजे यक्ष, किन्नर आणि गंधर्व यांना आपल्या दरबारात मनोरंजनासाठी ठेवत. त्यांना मोठी बिदागी देत तर काहीवेळा त्यांना दरबारातील खास पदेही देण्यात येत. अशा मनोरंजन करणार्‍यांच्या मौफिलीही आयोजित करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येई. कालांतराने या समुदायाला आपणही राजकारण करावे असे वाटू लागले. भारतात अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी राजकारणात  आपले नशीब आजमावले त्यात एन.टी.रामराव, एमजी.रामचंद्रन, जयललिता आणि आताचे अभिनेते कमलहसन व रजनीकांत याचा समावेश होईल. त्यातल्या त्यात एन.टी. रामराव, एमजी. रामचंद्रन, जयललिता यांची मजल त्या-त्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवण्यापर्यंत गेली तर काही नेत्यांचा समावेश केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्यापर्यंत झाला. कालपर्यंत जे अभिनेते लोकांच्या मनोरंजनाचे प्रेरणास्थान होते ते कालांतराने राजकारण्यांचेही प्रेरणास्थान बनले. या अभिनेत्यांना राजकारणात यश मिळवण्यासाठी त्यांच्या प्रतिमे बरोबर त्यांच्याकडे असलेली अचूक शब्दफेक आणि अभिनय या प्रतिभेचा उपयोग झाला. अभिनेत्यांच्या याच प्रतिभेचा उपयोग राजकारणातील काही जणांनी करून आपली प्रतिमा राजकारणातील अभिनयाबाबतीत लार्जेर दॅन लाईफ अशी बनवली आहे. त्यात प्रामुख्याने आपल्या मोदीजींचा क्रमांक वरचा ठरल्यास नवल वाटू नये.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नुकताच अमेरिकेचा दौरा संपन्न झाला. त्यांच्या या बहुचर्चित अमेरिका दौर्‍याची शनिवारी रात्री सांगता झाली. शनिवारीच रात्री परतल्यावर त्यांनी ‘सेंट्रल विस्टा’ या केंद्र सरकारच्या महत्वाच्या प्रकल्पाला भेट दिली. जेवढी चर्चा गोदी मिडीयाने पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याबाबत केली नाही त्याहून अधिक चर्चा मोदींच्या या रात्रीच्या भेटीची आणि त्यावेळी झालेल्या फोटोसेशनची झाली. मोदीजी अचानक जर थेट अमेरिकेतून सेंट्रल विस्टा साईटवर गेले असतील तर एवढ्या रात्री त्या प्रकल्पावर फोटोग्राफर कोठून आले आणि मोदींनी त्यांना निरनिराळ्या पोझमध्ये फोटो कसे काय दिले? हा सध्या समाज माध्यमांवरील चर्चेचा विषय ठरला आहे. त्यापूर्वी मोदींनी विमानात आपण किती काम करतो हे दाखवणारे फोटो समाजमाध्यमांवर टाकले. त्यातही मोदींनी हातात घेतलेल्या पेपर्स वर प्रकाश खालून पाडण्यात आल्याने पुन्हा मोदीजींना ट्रोल करण्यात आले. देशाचे पंतप्रधान मोदी हे अठरा-अठरा तास काम करतात हे देशवासीयांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न या फोटोसेशनच्या माध्यमातून जाणीवपूर्वक करण्यात आला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यापूर्वीचे पंतप्रधानही अठरा-अठरा तास काम करीत पण त्यांनी कधी असे फोटोसेशन करून देशवासियांकडून वाहवाह मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. पण, मोदींच्या बाबतीत असा प्रयत्न वारंवार होताना दिसत असून स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार असून देशाच्या पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीला ते शोभत नाही. माणसाचे काम बोलले पाहिजे, पण इथे तर कामापेक्षा फक्त ‘मन की बातच’ होत असते. त्यामुळे जगातील सर्वात मोठा पक्ष  असलेल्या भाजपच्या मोदींना प्रसिद्धीसाठी अशा शुल्लक दांभिकतेची गरजच काय ? तर त्याचे उत्तर स्वतःमध्ये नसलेल्या क्षमतेबाबत देशवासीयांसमोर उभ्या केलेल्या चुकीच्या प्रतिमेत आहे.  

मोदींनी यापूर्वी सहावेळा अमेरिकेचा दौरा केला आहे. पण यावेळचा दौरा तसा आव्हानात्मक होता. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष हे मोदींना चांगलेच ओळखत असून गुजरात दंगलीतील भूमिकेमुळे त्यांना अमेरिकेचा व्हिजा देऊ नये अशी भूमिका अमेरिकेने घेतली त्यात बायडेन यांची महत्वाची भूमिका असल्याचे बोलले जाते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदींचे घट्ट मैत्रीबंध निर्माण झाले होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी चक्क त्यांना भारत आणि मोदींचा पाठिंबा असल्याचे जाहीर करून टाकले होते. ह्युस्टन येथील ‘हौडी मोदी’ कार्यक्रमात उत्साहाच्या भरात मोदींनीही ‘अब की बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणा देऊन टाकली होती. खरंतर इतर कोणत्याही राष्ट्राच्या निवडणुकीत दुसर्‍या राष्ट्राने भाग घेऊ नये हे संकेत असताना मोदींनी ट्रम्प यांना पाठिंबा देऊन आपल्या पायावर कुर्‍हाड मारली, त्याचा तणाव मोदींच्या या दौर्‍यातील देहबोलीत जाणवत होता. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबतची त्यांची पहिलीच शिखर परिषद असल्याने ते मोदींना कसा प्रतिसाद देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. चीनवर अंकुश ठेवण्यासाठी ‘क्वाड’ गटाच्या पहिल्याच प्रत्यक्ष बैठकीच्या निमित्ताने जपान, ऑस्ट्रेलिया आणि मोदीजी एकत्र येणार होते. पण या बैठकीच्या तोंडावरच अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या ‘ऑकस’ नामक लष्करी सहकार्य गटाची घोषणा बायडन यांनी करून भारताला त्यापासून दूर ठेवले. या सर्व पार्श्‍वभूमीवर मोदींची परराष्ट्र रणनीती सपशेल नाकाम झाली असल्याचे जाणवत आहे. यापूर्वी अमेरिकेत अनिवासी भारतीयांची तसेच हजारो लोक पद्धतशीर भारतातून पाठवून मोठी गर्दी जमवून नसलेल्या लोकप्रियतेचे प्रदर्शन केले. पण यावेळी टक्कर कसलेल्या बायडेन सोबत असल्याने हा दांभिकतेचा बुरखा टराटरा फाडला गेला आणि मोदींच्या राजकारणातील अभिनेता उघड पडला.   

370 कलम रद्द केले म्हणून स्वतःची पाठ थोपटणार्‍या मोदींच्या निर्णयाचा निषेध 2019 मध्ये  कमला हॅरीस यांनी केला होता. बायडेन आणि कमला हॅरिस यांनी बैठकीत लोकशाही मूल्ये आणि महात्मा गांधी याच्या तत्वांबाबत मोदींची अप्रत्यक्षपणे शाळा घेतली. अमेरिकेच्या दौर्‍यात मोदींनी जरी गांधींच्या मुल्यांना आपण महत्व देत असलो असे सांगितले असले तरी त्यांचे गोडसे प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे भारतात जरी मोदींच्या या दुट्टप्पी राजकीय अभिनयाला दाद मिळत असली तरी आंतरराष्ट्रीय मंचावर ती मिळेलच याची शाश्‍वती नाही. या अमेरिका दौर्‍यात मोदींच्या ना कोणी स्वागताला आले ना कोणी निरोप द्यायला. संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेला संबोधित करताना त्यांनी भारतात रुजलेल्या लोकशाहीमुळे एक चहावाला पंतप्रधान बनला असे सांगितले तरी पंतप्रधान झाल्यानंतर ते किती लोकशाही मूल्यांची बूज राखतात हे संपूर्ण जग पाहत आहे. मांजराने जरी डोळे मिटून दूध पिले तरी इतरांना ते दिसत असते. आपल्या दांभिक राजकीय अभिनयाने कितीही पडदा टाकला तरी सत्य हे अंतिम असते हे मोदींना जाणवले असेल. ज्याच्या विचारात आणि आचरणात दांभिकता नसते त्याच्या विचारांना जगात किती मान असतो याची जाणीव बायडेन आणि हॅरिस यांच्या बोलण्यातून मोदींना आली  असेल. यापुढे राजकारणातील अभिनयाच्या दांभिकतेवर मोदींनी अवलंबून न राहता सर्वसमावेशक राजकारणाची कास धरावी एवढा धडा ताज्या अमेरिकावारीतून घेतला तरी पुरे!

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट