सणासुदीच्या हंगामात बँकांची विशेष कर्जमोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 19, 2021
- 910
नवी दिल्ली ः अर्थव्यवस्थेत पुनर्प्राप्तीची गती वाढवण्यासाठी सरकारने सणासुदीच्या हंगामाचा उपयोग करून घेण्याचं ठरवलं आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये बँकांकडून विशेष कर्ज मोहीम सुरू करण्यात आली आहे. बँका सर्व प्रकारच्या खरेदीदार, शेतकरी, लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग आणि किरकोळ व्यापार्यांना कर्ज देत आहेत आणि यात 15 प्रकारच्या कर्जांचा समावेश करण्यात आला आहे. घर, कार, टीव्ही-फ्रिज यासारख्या वस्तूंच्या खरेदीबरोबरच या मोहिमेत मुद्रा कर्जही समाविष्ट करण्यात आलं आहे.
वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार, सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कर्ज योजना सुरू केली गेलेली नाही. ही मोहीम वेगवेगळ्या जिल्ह्यांमद्घ्ये वेगवेगळ्या दिवसापासून सुरू केली जात असून 8-10 दिवस चालवली जाईल. या संदर्भात, मंत्रालयाने सर्व बँकांना निर्देश जारी केले आहेत आणि बँक आपल्या सोयीनुसार ही कर्ज मोहीम सुरू करत आहे. ऑगस्टच्या अखेरीस, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की सणासुदीच्या काळात ऑक्टोबरमध्ये वापर वाढवण्यासाठी विशेष कर्ज मोहीम सुरू केली जाईल.
रेडसीर या पाहणी संस्थेच्या मते, सणासुदीच्या पहिल्या आठ दिवसांमध्ये 62 दशलक्ष लोकांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदी केली. गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या सुरुवातीला याच कालावधीत ई-प्लॅटफॉर्मवर झालेल्या विक्रीच्या तुलनेत ही वाढ 23 टक्के होती. त्याच वेळी, रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाचं म्हणणं आहे, की या वर्षी सप्टेंबरमध्ये 2019 च्या सप्टेंबर महिन्यात किरकोळ विक्री 96 टक्क्यांवर पोहोचली होती आणि सणासुदीच्या काळात किरकोळ विक्री पूर्णपणे प्री-कोरोनाच्या पातळीवर पोहोचेल. बँक ऑफ इंडियाने आपल्या गृह कर्जावरील व्याजदरात 0.35 टक्के कपात केली आहे. आता त्याचा व्याजदर 6.50 टक्क्यांपासून सुरू होईल. त्याचबरोबर बँकेने वाहन कर्जावरील व्याज दरही 7.35 वरून 6.85 टक्के इतका कमी केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai