मुलींनीही सजग राहावे
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 28, 2021
- 491
आर राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
नवी मुंबई ः भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मुलांबरोबरच मुलींनीही सजग राहणे आवश्यक असून यास्तव शिक्षणाची कास धरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, थोर समाजसेवक आर. राधाकृष्णन यांनी नेरुळ येथे झालेल्या कार्यक्रमात केले.
श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट या संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रात फार मोठे योगदान असून दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर. राधाकृष्णन व सचिव ललिता राधाकृष्णन हे दाम्पत्य अहोरात्र झटत असतात. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून आजतागायत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केलेली आहे. या वर्षीही या संस्थेने दुर्बल घटकातील 300 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देऊन आपल्या पायावर उभे राहण्यास सर्वतोपरी मदत केली आहे. नवी मुंबई महानगर पालिका शाळा क्रमांक 101, शिरवणे शाळेतील विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच दुर्बल घटकातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आहे. मुलांनी आपले ध्येय निश्चित करुनच त्या दिशेने योग्य ती वाटचाल करणे गरजेचे असल्याचे यावेळी संस्थेच्या मुख्य सचिव ललिता राधाकृष्णन सांगितले. यावेळी संस्थेच्या मुख्यसचिव ललिता राधाकृष्णन, केंद्रप्रमुख आत्माराम मिरकुटे, मुख्याध्यापक मंगल भोईर, साहित्यिक अमृत पाटील नेरुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai