युवासेनेचे दरवाढी विरोधात राज्यव्यापी आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2021
- 511
ऐरोलीतील सायकल रॅलीला उंदड प्रतिसाद
नवी मुंबई ः महाराष्ट्र राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे वाढत असून इतर राज्यात दर कमी आहेत, मग महाराष्ट्राची लूट का? असा सवाल उपस्थित झाला असून नागरिकांची होणारी लूट थांबविण्यासाठी केंद्र सरकारचा निषेध करण्याच्या उद्देशाने युवासेनेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. नवी मुंबईत काढलेल्या सायकल रॅलीत शिवसैनिकांसह अनेक नागरिकांनी सहभाग घेतला.
नवी मुंबईत ऐरोली विधानसभा क्षेत्रात शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर यांच्या नेतृत्वाखाली तर बेलापुर विधानसभा क्षेत्रात जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, शहरप्रमुख विजय माने यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात आली. युवासेनेच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात काढलेल्या सायकल रॅलीला नवी मुंबईत जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. ऐरोली संघातील रॅली दिवा सर्कल येथून निघालेली ही सायकल रॅली से-5, पेट्रोलपंप, से-4, से 3 मधून ऐरोली रेल्वे स्टेशनपर्यंत काढण्यात आली. संपुर्ण लसीकरणाचा खर्च 67,113 हजार कोटी दाखवतायत पण मोदी सरकारने पेट्रोल डिझेलवर लादलेल्या दरवाढीतून आज पर्यंत 25 लाख कोटींची वसुली केलीय त्या वसुलीचे काय झाले? कोविडचा मुकाबला करण्यासाठी पीएम केअर फंड हे बिगर सरकारी खाते उघडून त्यात उद्योगपती, सरकारी उपक्रमातील कंपन्या यांच्याकडून लाखो-कोटी रुपये जमा केले ते वेगळेच. कुठे गेले ते पैसे? जनतेचे रोज दिवाळे निघत आहे पण भाजपावाल्यांची दिवाळी मात्र जोरात चाललीय. कुठे गेले ते बांगड्या फोडणारे आंदोलक? हेच का तुमचे अच्छे दिन? असे अनेक प्रश्नांची सरबत्ती आंदोलकांनी केली.
यावेळी शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, नगरसेवक राजू पाटील, जगदीश गवते युवासेनेचे विस्तारक, नगरसेवक चेतन नाईक, उपविभागप्रमुख आप्पा गावडे युवासेनेचे अक्षय किंद्रे, राजेश मोरे, योगेश मोरे, ओमकार कुळकर्णी, अभिजित जाधव यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai