एनएमएमटीची प्रवासी सेवा कर्जतपर्यंत
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 20, 2021
- 786
नवी मुंबई ः नवी मुंबईसह पनवेल, मुंबई, कल्याण डोबिंवली, ठाणे या उपनगरात प्रवाशांना सेवा देणार्या एनएमएमटीची प्रवासी सेवा आता कर्जतपर्यंत जाणार आहे. एमएमएमटी बसचा नवीन बस मार्ग क्र.49 - नवी मुंबई ते कर्जत असा सुरू करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संपाच्या अनुषंगाने नवी मुंबई व कर्जत विभागातील नोकरी, धंदा, विविध व्यवसाय करणारे प्रवाशी तसेच लोकप्रतिनिधी यांचेकडून मोठ्या प्रमाणात वारंवार केल्या जात असलेल्या मागणीनुसार तसेच या कार्यक्षेत्रात असलेल्या शाळा / कॉलेजेस सुरू होत असल्याने प्रवाशी जनतेच्या हितार्थ 17 नोव्हेंबरपासून एमएमएमटी बसचा नवीन बस मार्ग क्र.49 - नवी मुंबई ते कर्जत असा सुरू करण्यात आला आहे.
प्रवास मार्ग
बेलापूर रेल्वे स्थानक, बेलपाडा गाव / खारघर रेल्वे स्थानक, स्पॅगेटी /घरकुल, कामोठे गाव / के.एल.ई.कॉलेज, आसुडगाव आगार, ठाणा नाका, पनवेल रेल्वे स्थानक (सर्कल), भिंगारी, हॉटेल राहुल पार्क, कोन गाव, शेंडुग, ठोंबरेवाडी / गोदरेज सिटी, बारवईगाव -1, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालय, लोधिवली, चौक नाका, एन.डी.स्टुडीओ / आदिवासी पाडा, इंद्रप्रस्थ / ठाकूर इस्टेट, वावर्ले, हालफाटा, कर्जत बस स्थानक,
बस संख्या 08
प्रस्थानांनतर 30 ते 35 मिनिटे
पहिली बस बेलापूर रेल्वे स्थानक : 6.45
कर्जत बस स्थानक : 6.50
शेवटची बस बेलापूर रेल्वे स्थानक : 20.45
कर्जत बस स्थानक : 21.15
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai