Breaking News
प्रेमाचा अर्थ नव्याने उलगडून सांगण्याकरता चित्रपट निर्माते जे. उदय यांचा लॉ ऑफ लव्ह हा सिनेमा व्हॅलेंटाईन महिन्यात 4 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख त्यांच्या सोशल मीडियाद्वारे जाहीर करत चाहतेवर्गाला ही गोड बातमी दिली आहे.
अभिनेता जे. उदय यांचा चित्रपट निर्मिती तसेच अभिनयाचा पहिलाच अनुभव असून त्यांच्या सोबत असलेली अभिनेत्री शालवी शाह देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याप्रमाणेच या सिनेमात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार आणि सचिन मस्के तसेच अभिनेत्री प्राची पालवे यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.
यानिमित्ताने चित्रपटाचे निर्माते तसेच अभिनेते जे. उदय सांगतात,प्रेमाची नवी परिभाषा चित्रपटामार्फत सांगण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, आम्हाला खात्री आहे की या चित्रपटातुन आम्ही प्रेक्षकांची मने जिंकू. वेदिका फिल्म क्रिएशन निर्मित लॉ ऑफ लव्ह येत्या 4 फेब्रुवारी 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai