तक्रार येताच तात्काळ कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 27, 2022
- 646
पनवेल ः शहरातील अतिक्रमण वाढल्याच्या तक्रारी येत असल्याने आयुक्तांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. खांदा वसाहतीतीत सेक्टर 17 मधील धारण तलावात (होल्डिंग पॉन्ड) भराव टाकून अतिक्रमण होत असल्याची तक्रार मिळताच पाचच मिनटात कारवाई करण्यात आल्याने अतिक्रमण करणार्यांचे धाबे दणाणले आहे. खांदा वसाहत सेक्टर 17 परिसरात सिडकोने धारण तलावाची निर्मिती केली आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये, अशा स्वरूपाच्या सूचना सिडकोने फलकाद्वारे लावल्या आहेत. मात्र तरी देखील काही व्यक्तींनी डेब्रिजचा भराव करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. या बाबतची तक्रार ऑनलाईन स्वरूपात आयुक्त देशमुख यांच्याकडे करण्यात आल्यावर ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेल्या आयुक्तांनी फक्त पाचच मिनिटात संबंधित अधिकार्यांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai