अभिनय शिबिरांचे आयोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 15, 2026
- 24
पनवेल ः महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 मे ते 19 मे असे नऊ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. पनवेल, कळंबोली व खारघर येथे सर्व कलावंतांसाठी हे शिबिर मोफत आहे.
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात नाट्य संस्कृती चळवळीस अधिक चालना मिळावी या करिता नाट्यकलावंतांना अभिनयाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे त्याकरिता महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार या अभिनय प्रशिक्षणचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनय प्रशिक्षण शिबीरासाठी दोन गट निश्चित करण्यात आले आहेत. यात पहिला गट विभाग म्हणजे वय वर्षे 8 ते 16 हा युवा गट व प्रौढ गट म्हणजे 17 ते 60 वयांपर्यंत यात सहभाग घेता येईल, प्रत्येक गटासाठी हे शिबीर पूर्णपणे मोफत आहे. संख्या मर्यादेमुळे प्रथम येणाऱ्या 30-30 नाट्यकर्मींना या शिबिरासाठी प्रवेश दिला जाईल.
युवा गटासाठी सकाळी 9 ते 12 व प्रौढ गटासाठी दुपारी 2 ते 5 अशी वेळा असतील. त्याचप्रमाणे पनवेल आणि खारघर येथे एक बॅच ही उच्चस्तरीय अभिनय प्रशिक्षणासाठी असेल. गतवर्षीच्या प्रशिक्षणापेक्षा अधिक वरिष्ठस्तरीय प्रशिक्षण मिळावे यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नाट्य, सिने क्षेत्रातील मान्यवरांकडून शिबीरात मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शेवटी सर्वांचे सादरी करण होईल. सर्व शिबीरांर्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी आपली नाव नोंदणी दिनांक 5 मे 2026 पर्यंत करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील नाट्य कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळावे व त्यांमधून पनवेलचे नाव राज्यात सर्वत्र पोहचावे याकरिता नाट्य परिषद विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. सध्या सुट्टीचे दिवस असल्याने युवा नाट्यकर्मींना अभिनय प्रशिक्षणास वेळ मिळु शकतो. या अभिनय प्रशिक्षण शिबिराचा मोठा फायदा पनवेल मधील कलावंतांना होईल असे परिषदेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक परेश ठाकूर यांनी म्हटले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai