आठवडा बाजारांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 15, 2026
- 26
पनवेल ः आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या दिलेल्या निर्देशानूसार तळोजा फेज-1, सेक्टर-10 येथे दिनांक 13 एप्रिल रोजी अनधिकृत बाजारांवर अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. या ठिकाणी कारवाई नंतर पुन्हा बाजार भरला जाऊ नये यासाठी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच उपविभाग नावडे अंतर्गत घोडगाव येथील अनधिकृत सोमवार बाजारांवर अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. या ठिकाणी देखील पुन्हा बाजार भरला जाऊ नये यासाठी अतिक्रमण कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या सुचनेनूसार सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्रभाग अधिकारी मनोज चव्हाण यांनी अनधिकृत आठवडे बाजारासाठी आलेल्या फेरीवाले ,हातगाड्यांवर तोडक कारवाई करून आठवडा बाजार बंद केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai