2 कोटीचे एमडी पावडर जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 09, 2022
- 683
नवी मुंबई : एमडी (मेथ्यॉक्युलॉन पावडर) हा अमली पदार्थ विकण्यासाठी खारघर येथील लिटिल वर्ल्ड मॉलजवळ आलेल्या दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. तसेच त्यांच्याकडून 2 कोटी 10 लाख रुपये किमतीचे 2 किलो 100 ग्रॅम वजनाचे एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या दोघांनी सदरचा अमली पदार्थ कुठून आणला व तो कुणाला विकणार होते, याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
शनिवारी (ता. 5) दुपारी दोन व्यक्ती खारघरमधील लिटिल वर्ल्ड मॉलसमोरील पार्किंगजवळ एमडी पावडरची विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-3 ला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथकाने सापळा लावला होता. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास समद नसीबखान शेख (वय 26) व प्रशांत दत्तात्रय वराट (वय 23) हे दोघे संशयास्पदरीत्या आले असता, गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी समद शेख याच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात 1 किलो 450 ग्रॅम, तर प्रशांत वराट याच्याकडे 650 ग्रॅम वजनाचे एमडी पावडर आढळून आली. या अमली पदार्थाबाबत अधिक चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गुन्हे शाखेने या दोघांविरोधात खारघर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai