Breaking News
मुंबईः विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) गेल्या चार महिन्यांपासून सतत बाजारातून पैसे काढून घेत आहेत. जानेवारी महिन्यात त्यांनी 37 हजार 721 कोटी रुपये काढले. तथापि, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी शेअर्सखरेदी सुरूच ठेवली आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी जानेवारीमध्ये 18 हजार 279 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक 25 जानेवारी रोजी चार हजार 534 कोटी रुपये इतकी होती. एफआयआयने त्याच दिवशी सर्वाधिक सात हजार 94 कोटी रुपये काढले आहेत. या दिवशी मात्र बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स 350 हून अधिक अंकांनी वर बंद झाला.
27 जानेवारी रोजी सहा हजार 266 कोटी रुपये काढल्यानंतर एफआयआयने 27 जानेवारी रोजी सहा हजार 266 कोटी रुपये तर 28 रोजी पाच हजार 45 कोटी रुपये काढले. जानेवारीमध्ये आतापर्यंतच्या ट्रेडिंगमध्ये या गुंतवणूकदारांनी केवळ चार दिवसांसाठी शेअर्स खरेदी केले आहेत. यामध्ये सर्वाधिक खरेदी चार जानेवारी रोजी एक हजार 273 कोटी रुपयांची झाली. डिसेंबरमध्ये 35 हजार 493 कोटी रुपये काढले गेले तर 31 हजार 231 कोटी रुपयांची खरेदी केली गेली. नोव्हेंबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 39 हजार 901 कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 30 हजार 560 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. देशांतर्गत गुंतवणूकदार सातत्याने शेअर्स खरेदी करत आहेत. आशियाई बाजार घसरले तसे सरत्या आठवड्यात आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली.
दक्षिण कोरियाचा बाजार सर्वाधिक 6.03 टक्के घसरला तर हाँगकाँगचा बाजार 5.67 टक्के घसरला. चीनचा बाजार 4.57 टक्के आणि भारताचा सेन्सेक्स 3.11 टक्के घसरला. जपानचा निक्की एका आठवड्यात 2.92 टक्के घसरला तर सिंगापूरचा बाजार 1.47 टक्के घसरला. गुंतवणूकदारांना अर्थसंकल्प रुचला तर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळू शकते, असं बाजारातल्या जाणकारांचं मत आहे. मात्र, जानेवारी महिन्यात सेन्सेक्समध्ये घसरण झाली. या काळात गुंतवणूकदारांना चांगल्या शेअर्समध्येही नुकसान सोसावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai