अगर काँग्रेस ना होती..
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 18, 2022
- 929
काँग्रेस ना होती तो भ्रष्टाचार ना बढता... 570 कोटींचं विमान 1670 कोटींना का विकत घेतलं गेलं? 58000 कोटी रुपयांच्या ह्या घोटाळ्याची चौकशी का थांबविण्यात आली? हा राफेल खरेदीचा करार करतांना हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) या अत्यंत अनुभवी व सरकारी कंपनीला डावलून फक्त 13 दिवस अगोदर स्थापन झालेल्या, संरक्षण क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेंस लि. ला या करारात सामील का करून घेण्यात आले? हेसुद्धा सांगा मा. मोदीजी. नोटबंदी हा देशातला सर्वात मोठा घोटाळा ठरलाय. खुद्द रिझर्व्ह बँकेने जाहीर केलंय की, 99% पैसा जमा झाला आहे. अमितजी शहा ज्या बँकेचे संचालक आहेत त्या गुजरातच्या बँकेत नोटबंदी काळात सर्वात जास्त नोटा बदलल्या गेल्यात. देशाच्या पंतप्रधानाने इतिहासात पहिल्यांदा खाजगी पी.एम. केअर्स फंड स्थापन केला, तो सरकारी फंड आहे अशी जाहिरात केली आणि जेव्हा माहितीच्या अधिकारात माहिती मागितली गेली तर तो खासगी फंड असल्याने त्याची माहिती देऊ शकत नाही म्हणून इतका मोठा घोटाळा झाकला. कोरोनाच्या कठीण काळात पैसे नाहीत सांगून 8400 कोटींचे विमान घेतले. 20 हजार कोटी खर्चून नवीन संसद भवन बांधण्याचा घाट घातला जातोय. हे सर्व घोटाळे आणि भ्रष्टाचार नाही तर दुसरं काय आहे मोदीजी? हे जनतेच्या पैशातून 8400 कोटींचे विमान वगैरे ऐकून प्रकर्षाने आठवते मोदीजी की पंडित नेहरूंनी आपल्या एकूण 196 कोटी रुपयांच्या संपत्तीमधून 186 कोटी रुपयांची संपत्ती देशासाठी स्वातंत्र्यलढ्यात दान केली होती. 11 वर्ष तुरुंगात काढली होती. 186 कोटी संपत्ती त्या काळात ज्या काळात कलेक्टर ला 50 रुपये पगार होता. तुम्ही देऊ नका निदान आहे ती विकू तरी नका.
या संसदेतील भाषणात तुम्ही जे बोलायला पाहिजे होत ते तर तुम्ही बोललाच नाहीत मोदीजी. अगर काँग्रेस ना होती तो मैं किसकी कम्पनिया बेचता? असं एक महत्वाचं वाक्य तुम्ही सोडून दिलंत. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात असा पंतप्रधान झाला नाही ज्याने 24 पेक्षा जास्त सरकारी कंपन्या विकल्यात. त्यातली एकही कंपनी मोदी सरकारने स्वतः बनविलेली नव्हती हे विशेष. सर्व कंपन्या काँग्रेस काळात बनविलेल्या होत्या. त्यांनी त्या कम्पन्या बनविल्या नसत्या तर तुम्ही काय विकलं असत मोदीजी? काहीही गरज नसतांना रिझर्व्ह बँकेतील जो दीड लाख कोटी रुपयांचा फंड आपण काढलात तो आपत्कालीन फंड काँग्रेसच्याच काळात रिझर्व्ह बँकेत जमा झालेला होता मोदीजी. काँग्रेस नसती तर तो फंडच नसता, त्यामुळे तुम्हाला तो काढताच आला नसता. जर काँग्रेस नसती तर तुम्ही काँग्रेसचे मोठे नेते सरदार वल्लभभाई पटेल आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांचे पुतळे बसवुच शकले नसते मोदीजी. तुम्हाला विदेशात सुद्धा काँग्रेसचेच नेते असलेल्या गांधींचे नाव घ्यावे लागते मोदीजी कारण तुमच्याकडे स्वातंत्र्यलढ्यात लढलेला एकही नेता नाही ज्याचे तुम्ही विदेशात नाव घेऊ शकता.
जेव्हा काँग्रेसच्या हातात सत्ता आली त्यावेळी या देशात एक सुई सुद्धा बनत नव्हती. इंग्रजांनी लुटून देश खिळखिळा करून टाकला होता. मग नेहरूंनी सुद्धा म्हणायला पाहिजे होत की, इंग्रजांनी हा देश लुटून बरबाद केला, काहीच शिल्लक ठेवलं नाही. 150 वर्षात सर्व लुटून नेलं. मी देश कसा चालवू? मी कसा विकास करू? पण नेहरूंनी सुई न बनणार्या ह्या देशात आयआयटी, मेडिकल कॉलेज, रिसर्च सेंटर, विद्यापीठे, विमानतळे, सरकारी कंपन्या बनविल्या. मोदी सरकार ज्या सोशल मीडियाच्या आधाराने देशात सत्तेवर बसलं तो सोशल मीडिया ज्याद्वारे हाताळला जातो ते कम्प्युटर, मोबाईल सुद्धा काँग्रेस काळातच देशात आलेत हे विसरू नका मा. मोदीजी. त्याच मोबाईल आणि कम्प्युटर चा वापर करून , खोटा प्रचार करून आज तुम्ही सत्तेत आहात मा.मोदीजी. इंग्रजांच्या हातून ज्यावेळी काँग्रेसने हा देश हाती घेतला त्याकाळी देशाची जी स्थिती होती त्या स्थितीपेक्षा 2014 सालची देशाची स्थिती लाख पटीने चांगली होती. ती तुम्ही बिकट करून ठेवली आहे. देशावर गेल्या 70 वर्षात झालेले 54 लाख कोटींचे कर्ज तुम्ही 2014 पासून फक्त 7 वर्षात 101 कोटींच्या पार घेऊन गेले आहात. बोलतांना कधीच आपण या देशाचे पंतप्रधान वाटत नाही. कायम भाजपचे प्रवक्ते वाटता. पाकिस्तान, मुस्लिम, काँग्रेस-नेहरू यावरच आयुष्यभर बोलणार आहात की कधी रोजगार, विकास, महागाई, चीनवर सुद्धा बोलाल मोदीजी? इथे दुधाने धुतलेला कुणीच नाही. मी हे लिहितोय म्हणजे काँग्रेस खूपच चांगली आहे असे अजिबात नाही परंतु तुमच्यापेक्षा निश्चितच लाख पट चांगली आहे. आज जिथे विरोधकांना पाकिस्तानी-देशद्रोही म्हणण्याचा प्रघात पडलाय तिथे स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेसच्या पहिल्या मंत्रिमंडळात काँग्रेसने विरोधी पक्षाच्या 7 लोकांना मंत्री म्हणून घेतले होते ज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा समावेश होता. कारण त्यांना देशाचे मंत्रिमंडळ हवे होते पक्षाचे नाही. अटलबिहारी वाजपेयी यांना किडनीचा त्रास होता. आपल्या देशात उपचार शक्य नव्हते, विदेशात उपचार करण्यासाठी आर्थिक तरतूद नव्हती. वाजपेयी यांचे विदेशात किडनीचे ऑपरेशन व्हावे म्हणून राजीव गांधींनी भारताच्या प्रतिनिधी मंडळासोबत वाजपेयींना संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीसाठी पाठविले व सांगितले की तिथे तुम्हाला उपचार घेत येतील. खुद्द अटलबिहारी यांनी म्हंटल होते की मी आज केवळ राजीव गांधींमुळेच जिवंत आहे. काँग्रेस नसती तर इतके प्रगल्भ राजकारण या देशाने कधी पाहिलेच नसते मोदीजी. आणि हो सर्वात महत्वाचे हे की, जर काँग्रेस नसती तर आपला देशच स्वतंत्र झाला नसता मोदीजी. त्यामुळे देशात राज्यघटना लिहिल्या गेली नसती. आणि तुम्ही ओबीसी असून या देशाचे पंतप्रधान कधीच बनू शकले नसते. आणि तुम्ही पंतप्रधान बनले नसते तर आम्हा जनतेला सुध्दा कळले नसते की काँग्रेस तुमच्यापेक्षा कीतीतरी चांगली होती..
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai