अशोक पालवे यांना पुरस्कार


नवी मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या सन 2017-18मध्ये आयोजित 57व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत प्राथमिक फेरीत नवी मुंबईतील ज्येष्ठ नाट्यकर्मी अशोक पालवे यांना दोन पुरस्कार मिळाले आहेत. मुंबईतील प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात झालेल्या विभागीय पारितोषिक वितरण समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘सल’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक तर दिग्दर्शनासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. ठाणे, रायगड आणि पालघर जिह्यातील 27 नाटकांची पहिली फेरी पनवेल येथील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली होती. ज्येष्ठ मराठी कलाकार विजय कदम व प्रकाश निमकर, विलास जाधव व प्रमोद पवार आदींनी पालवे यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.