तुर्भ्यात रंगला ‘जल्लोष भीम गीतांचा’
- by Aajchi Navi Mumbai
- May 04, 2022
- 1034
नवी मुंबई ः शिवसेना व कर्तव्य सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही 30 मे 2022 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
शिवसेना विभागप्रमुख महेश कोटीवाले व शाखाप्रमुख तथा बेलापूर विधानसभेचे उपविधानसभा युवा अधिकारी सिद्धाराम शिलवंत यांच्या नेतृत्वाखाली महेश कोटीवाले युवा मंचच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे सोमवारी विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यानिमित्ताने इंदिरानगर, तुर्भे एमआयडीसी येथे ‘जल्लोष भीम गीत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक-युवती, भीमसैनिक व महेश कोटीवाले युवा मंचचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai