विष्णुदास भावे नाट्यगृहात नटराज मूर्तीची प्रतिष्ठापना
- by Aajchi Navi Mumbai
- May 04, 2022
- 1127
नाट्यकर्मी प्रशांत दामले, वर्षा उसगावकर यांच्या हस्ते अनावरण
नवी मुंबई ः अचूक योग साधणे ही देखील एक कला असून आज अक्षय तृतीयेसारख्या शुभमुहूर्तावर नवी मुंबई महानगरपालिकेने विष्णुदास भावे नाटयगृहात नाटयदेवता नटराज मूर्तीची प्रतिष्ठापना करुन एक उत्तम मुहूर्त साधला आहे अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत सुप्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कल्पकतेचे कौतुक केले.
वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या विष्णुदास भावे नाटयगृहात दर्शनी भागी स्थापन करण्यात आलेल्या ब्राँझ धातूच्या 6 फूट उंच मूर्तीचे अनावरण सुप्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले व नामांकित अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर संपन्न झाले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रशांत दामले यांनी स्वच्छ व सुंदर असा देशात नावलौकीक असणारे नवी मुंबई शहर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच आघाडीवर असून येथे सुविधा निर्मितीप्रमाणेच त्या सुविधांच्या देखभालीवरही विशेष लक्ष दिले जाते असा अनुभव असल्याचे सांगत विष्णुदास भावे नाटयगृह हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे मत व्यक्त केले. आगामी काळात ऐरोलीतही नाटयगृह निर्माण होत असून यामधून नवी मुंबईतील नाटय रसिकांना आणखी एक चांगली सुविधा उपलब्ध होईल याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई नावाप्रमाणेच नाविन्याला प्राधान्य देत असून आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नाटयदेवता नटराज मूर्तीचे अनावरण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले अशा शब्दात आनंद व्यक्त करीत नामांकित अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी बुके ऐवजी बुक भेट देत नवी मुंबई महानगरपालिकेने वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याचा जपलेला वसा प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विष्णुदास भावे नाटयगृहातही राबविली जाणारी नियोजित ग्रंथालयाची संकल्पना अभिनव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ब्राँझ धातूची 165 किलो वजनाची ही 6 फूट उंच आकर्षक नटराज मूर्ती शिल्पकार रवि वाडकर यांच्या संकल्पनेतून व सजावटीतून साकारलेली आहे. या अनावरणप्रसंगी नाटयरसिकही मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai