नैना परियोजना 4 ते 7 साठी सूचना व हरकतींचे आवाहन
- by Aajchi Navi Mumbai
- May 07, 2022
- 723
नवी मुंबई ः नैना प्रकल्पाकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नैना प्रकल्पातील 23 गावांच्या मंजूर करण्यात आलेल्या अंतरिम विकास आराखड्याची अंमलबजावणी सिडकोतर्फे करण्यात येत आहे. त्यानुसार प्रारुप नगर रचना परियोजना क्र. 4, 5, 6 आणि 7 तयार करण्याचा इरादा महाराष्ट्र शासन राजपत्रासोबतच स्थानिक वर्तमानपत्रांतदेखील जाहीर करण्यात आला होता. सदर प्रारुप योजनांविषयी काही सूचना व हरकती असल्यास, जमीन मालकांनी सिडकोच्या नैना कार्यालयात सादर करण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.
या प्रस्तावाचा भाग म्हणून प्रारुप नगर रचना परियोजना क्र. 1, 2 आणि 3 ला शासनाने मंजुरी दिली आहे. प्रारुप नगर रचना परियोजना क्र. 4, 5, 6 आणि 7 तयार करण्याचा इरादा अनुक्रमे दिनांक 21 जून 2019, 26 जून 2019, 08 ऑगस्ट 2019 व 18 सप्टेंबर 2019 रोजी जाहीर करण्यात आला होता. सदर योजना प्रसिद्ध करण्यासंबंधीची सूचना 25 एप्रिल 2022 च्या महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परियोजनांचे सविस्तर नकाशे, अहवाल आणि नियमावली फॉर्म क्र. 1 व 2 जमीन मालकांना पाहण्याकरिता नैना कार्यालय, 7वा मजला, टॉवर क्र. 10, सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक संकुल तसेच सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
संबंधित जमीन मालकांनी मूळ जमिनीचा आकार व त्यांना देऊ करण्यात आलेले अंतिम भूखंडाचे क्षेत्र यांमध्ये काही तफावत आढळल्यास, तसेच उपरोक्त प्रारुप योजनांविषयी काही सूचना व हरकती असल्यास, प्रारुप योजना प्रसिद्ध करण्यासंबंधीची सूचना 30 दिवसांच्या आत सिडकोच्या नैना कार्यालयात 7/12 आणि गटबुकासह सादर कराव्यात, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. ग्राह्य सूचनांच्या अनुषंगाने उपरोक्त प्रारुप परियोजना राज्य शासनाच्या मंजुरीस्तव सादर करण्यात येणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai