सावरखार येथील 22.7 हेक्टर पाणथळ नष्ट होण्याच्या मार्गावर
- by Aajchi Navi Mumbai
- May 19, 2022
- 544
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरही माती व डेब्रिजचा भराव सुरुच
उरण : जेएनपीटी परिसरातील सावरखारमधील पाणथळ जमीन बुजवण्यात येत असल्याच्या पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर याची दखल केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असतानाही हे पाणथळ क्षेत्र बुजवण्यात आले आहे. 22.7 हेक्टर म्हणजे सुमारे 55 एकरपेक्षा जास्त क्षेत्र आहे. त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जासई आणि भेंडखळ येथील अंतर्गत प्रवाहाला अटकाव केल्यानंतर सर्वात महत्त्वाची पाणथळ सुकून गेल्याची ही उरणमधील तिसरी घटना आहे, असे नॅट कनेक्ट फाऊंडेशनचे बी.एन.कुमार यांनी सांगितले. उरण, नवी मुंबईमध्ये पाणजे, बेलपाडा, भेंडकल, टीएस चाणक्य, एनआरआय कॉम्प्लेक्स, भांडुप पंपिंग स्टेशन, भोकडवीरा, सावकार आणि जासई अशा पाणथळ जागा आहेत. यापैकी उरणमधील भेंडखळ, भोकडवीरा, जासई आणि सावरखार पाणथळ जागा गेल्या दोन वर्षांत पूर्णत: नष्ट झाल्या आहेत. पाणजे येथील पाणथळ जागा वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित पाणथळ जागाही आता नष्ट होण्याच्या मार्गावर असून याकडे प्रशासन काणाडोळा करीत आहे. वनशक्तीने याविरोधात संबंधित विविध सरकारी विभागाच्या प्रमुखांकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणी लवकरच अवमान याचिकाही दाखल करण्यात येणार आहे.
यातील सावरखार येथे 22.7 हेक्टर क्षेत्र पाणथळ होते. हे पाणथळ बुजवण्यात येत असल्याबाबत फेब्रुवारी 2022 मध्ये नॅट कनेक्ट फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाचे डॉ.एम.रमेश यांनी प्राधान्याने या तक्रारीकडे लक्ष देण्याचे निर्देश राज्य पाणथळ प्राधिकरणाला दिले होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयानेही याची दखल घेत पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांना याबाबत निर्देश देण्यात आले होते. तरीही याबाबत उचित कार्यवाही झाली नाही. रायगड जिल्हाधिकार्यांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांची दखल घेत महसूल अधिकार्यांनी दिवसभरासाठी या भरावाचे काम थांबविले आणि गुन्हाही दाखल केला होता. मात्र तरीही अज्ञात व्यक्ती येथे माती व डेब्रिजचे ट्रक खाली करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai