ओबीसींचे हक्क त्यांना मिळवून देणार

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई : मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी मोठी घोषणा केली आहे. ‘सरकारी नोकरीतील ओबीसींचा आढावा घेणार असून त्यानंतर सरकारी भरतीतील ओबीसींचा बॅकलॉग भरून काढणार असल्याचं मुंख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ओबीसी महामंडळाला 500 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ओबीसींचे हक्क त्यांना मिळवून देणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

ओबीसींच्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. ओबीसींच्या जागा इतर कोणालाही देणार नसल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नागपूरमध्ये नवं हॉस्टेल तयार होत असून महाराष्ट्रातील आणखी 19 जिल्ह्यांमध्ये ओबीसीसाठी हॉस्टेल बनवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार देखील ओबीसी समाजासाठी मोठे निर्णय घेत असून ओबीसीसाठी बजेटमध्ये 41 टक्क्यांची वाढ केली आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.