मोक्षदाह नाटकाची 60 व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेत बाजी
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 01, 2022
- 1076
नवी मुंबई : 60 व्या राज्य हिंदी नाट्य स्पर्धेमध्ये वाशी येथील मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ या संस्थेच्या मोक्षदाह या नाटकाने प्रथम क्रमांक पटकवला आहे. त्याचप्रमाणे तन्मयी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नागपूर या संस्थेच्या थलाई कुथल या नाटकासाठी द्वितीय क्रमांक तर सागंली येथील समांतर या संस्थेच्या पुर्णविराम या नाटकाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच झंकार सांस्कृतिक मंच, सोलापूर या संस्थेच्या अग्निदिव्य एक अमृतगाथा हे नाटक चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले.
17 एप्रिल ते 24 मे 2022 या कालावधीत पुणे येथील भरत नाट्य मंदिर, गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर, आणि नागपुर येथील सार्येटिफिक सभागृहात 60 वी राज्य हिंदी नाट्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 46 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत वाशी येथील मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ या संस्थेच्या मोक्षदाह या नाटकाने प्रथम क्रमांक पटकवला. या नाट्य स्पर्धेमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून नाटकाचे दिग्दर्शन, नाट्यलेखन, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा, उत्कृष्ट अभिनय आदींसाठी पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यात दिग्दर्शनासाठी मोक्षदाह नाटकाचे दिग्दर्शक अशोक पालवे यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले. तर थलाई कुथल नाटकाचे दिग्दर्शक सलीश शेख यांना द्वितीय तर पुर्णविराम नाटकाचे दिग्दर्शक प्रताप सोनाळे यांना तृतीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे नाट्यलेखनमध्ये मोक्षदाह नाटकाचे लेखक डॉ.सोमनाथ सोनवलकर यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले. तसेच जड नाटकाचे निकिता ढाकुलकर यांना दिव्तीय तर थलाई कुथल नाटकाचे लेखक सलीम शेख यांना तृतीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. तसेच नाटकाची प्रकाश योजना या विभागामध्ये पुर्णविराम नाटकाचे ओंकार मोरे यांना प्रथम पारितोषिक तर मोक्षदाह नाटकाचे श्याम चव्हाण यांना द्वितीय आणि गटार नाटकाचे किशोर बत्तासे यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले. नेपथ्यसाठी गटार नाटकाचे रितीक अमाळकर यांना प्रथम पारितोषिक तसेच पुर्णविराम नाटकाचे प्रताप सोनाळे यांना द्वितीय तर मोभदाह नाटकाचे महेंद्र तांडेल यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. त्याचप्रमाणे नाटकातील रंगभूषा साठी विष्णुदास भावे नाटकाचे चैतन्य थरकुडे यांना प्रथम, थलाई कुथल या नाटकाचे लालजी श्रीवास यांना द्वितीय तर कथा एक कंस की नाटकाचे राजन वर्दम यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले आहे.
- दरम्यान, अशोक पालवे (नाटक-मोक्षदाह), अभिजित केळकर (नाटक-विष्णुदास भावे), सागर कदम (नाटक-अननोन फेस), सलीम शेख (नाटक थलाई कुथल), रोहित वानखेडे (नाटक-गटार), मंजुषा लोंढे (नाटक-मोक्षदाह), पायल पांडे (नाटक-पुर्णविराम), नेहा पवार (नाटक-अम्मो), स्नेहा सयाम (नाटक-जत्रा), बकुळ धवन (नाटक-रुपक) आदींना उत्कष्ट अभिनयाचे रौप्यपदक देण्यात आले आहे. तर नाटकाच्या अभिनयासाठी 20 नाटकांना गुणवत्ता प्रमाणपत्रे देण्यात आली. या स्पर्धेसाठी वासुदेव विष्णुपुरीकर, नरेंद्र आमले, प्रियंका ठाकूर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai