नवघर ग्रामस्थांचे आंदोलन तूर्तास स्थगित
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 08, 2022
- 853
उरण ः विविध समस्या संदर्भात सोमवार नवघर ग्रामस्थांच्या वतीने सिडको कार्यालय द्रोणागिरी नोड बोकडविरा येथे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र सिडकोचे कार्यकारी अभियंता एच.डी.नहाने यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले. असून एच डी नहाने यांनी वरिष्ठ अधिकारी पी.एम.सेवतकर यांच्या सोबत ग्रामस्थांची फोनवर चर्चा घडवून दिली व 15 सप्टेंबर रोजी संयुक्त बैठक घेऊन योग्य तो निण7य घेण्याचे मान्य केल्याने ग्रामस्थांनी आंदोलन तुर्तास स्थगित केले.
नवघर ते नवघर फाटा रेल्वे क्रॉसिंग रस्ता, रेल्वे स्टेशनला नवघर नाव द्यावे तसेच रेल्वे स्टेशन मध्ये निर्माण होणार्या नोकर्या आणि व्यवसायामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे असे मागण्या फोनवर समजावून घेऊन सिडकोचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे प्रशासन यांच्या सोबत 15 सप्टेंबर 2022 तारखेपर्यंत नवघर ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन योग्य तो निर्णय देण्याचे मान्य केले. जर 15 सप्टेंबर 2022 पर्यंत जर योग्य निर्णय झाला नाही तर आम्ही ग्रामस्थ उग्र आंदोलन करणार असे नवघर ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले आणि धरणे आंदोलन दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सिडकोची राहिल असेही ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai