कीटकजन्य आजार नियंत्रणाचा आढावा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 19
पनवेल ः महानगरपालिका हद्दीत मलेरिया, डेंग्यू यांसह कीटकजन्य आजारांचा प्रभावी प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाची आढावा बैठक दि.19ऑगस्ट रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली.
यावेळी महापौर नितीन पाटील यांनी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी विशेष स्वच्छता व सखोल साफसफाईच्या मोहिमा राबवाव्यात. रिकामे भूखंड, बांधकामस्थळे तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचे नियमित सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. धूरफवारणी व स्वच्छता मोहिमा राबविताना संबंधित प्रभागातील महापालिका सदस्यांचे सहकार्य घ्यावे. साथीचे आजार पसरणार नाहीत, यासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी पावसाळ्यात निर्माण होणारी डासांची उत्पत्तीस्थळे शोधून त्याठिकाणी जंतुनाशक व अळीनाशक फवारणी वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी साथीचे आजार पसरण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेच्या वतीने कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. बैठकीच्या सुरुवातीस कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai