मतदार यादींच्या हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 29, 2022
- 873
हरकतींसोबत रहिवासाचा पुरावा जोडणे अनिवार्य
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर आरक्षण सोडत आणि आता प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांवर 1 जुलैपर्यंत हरकती सादर करायच्या होत्या. मात्र आता त्यासाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. हरकतींसोबत रहिवासाबाबतचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. हरकतींच्या आधारे निर्णय घेऊन 9 जुलैला अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर होणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 31 मे 2022 पर्यंतची अद्ययावत केलेली यादी अंतिम करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 41 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये 40 प्रभागात 3 सदस्य तर 1 प्रभागात 2 सदस्य अशा 122 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. प्रत्यक्ष पालिका निवडणुकीत महत्त्वाचे ठरणारे मतदार व त्यांच्या याद्या यांच्याबाबत इच्छुकांकडून छाननी सुरू आहे. आगामी पालिका निवडणुकीत 8,45,524 एकूण मतदार निश्चित करण्यात आले असून प्रभागनिहाय 41 प्रभागांच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारुप मतदार यादीसंदर्भात 3 जुलैपर्यंत हरकती सूचना सादर करता येणार आहेत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी पालिका आयुक्तांनी मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी हरकती व सूचनांसाठी आवश्यक असणार्या बाबींची व कशा पद्धतीने कर्यावाही होणार याविषयी माहिती दिली. हरकतीसाठी नमुना राज्य निवडणुक आयोगाने निश्चित करुन दिलेला आहे. तसेच ट्रु-वोटर अॅप्लिकेशन उपलब्ध करुन दिला असल्याचे आयुक्तांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या नावाची आणि प्रभागांची नावे मतदार यादीत पडताळून काही बदल असतील तर त्यासाठी हरकती नोंदवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच हरकतींसोबत रहिवासी पुरावा जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. मात्र जर विधानसभा मतदार यादीत जो पत्ता असेल तोच अंतिम राहणार आहे. या प्रभागनिहाय जाहीर कऱण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यांबाबत हरकती व सूचना दाखल करताना त्यामध्ये मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणार्या चूका, विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे तसेच मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे अशा 3 बाबतीतच दुरुस्त्या करता येऊ शकतील हे आयुक्तांनी स्पष्ट केले. हरकत अर्जांचा जलद निपटारा होण्यासाठी विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. 9 जुलै रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai