नामांतरणाचे ऐतिहासिक निर्णय
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 29, 2022
- 915
मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावाला मान्यता
मुंबई ः महाराष्ट्रातील राजकारणात पदोपदी नवनवीन घडामोडी घडत असल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडी सरकार टिकणार की पडणार याकडे सर्वांचे लक्ष असताना राज्यातील काही शहरे, प्रकल्प यांच्या नामांतरणाचा महत्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यात औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील सरकार अडचणीत सापडले आहे. अनेक लक्षवेधी घडामोडी घडत असूून पुढे काय होणार याकडे सर्वांच्या लक्ष आहे. 24 तासात राज्य मंत्रिमंडळाची दुसरी बैठक झाली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्या या नामांतरणाच्या वादावर यामुळे पडदा पडला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे मोठे दहा निर्णय
- औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता
- उस्मानाबाद शहराच्या धाराशीव नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.
- (नगर विकास विभाग)
- राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)
- कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार (विधि व न्याय विभाग)
- अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार (परिवहन विभाग)
- ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
- विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय. (नियोजन विभाग)
- निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय( सामान्य प्रशासन विभाग)
- शासन अधिसुचना 8 मार्च 2019 अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय. (महसूल विभाग)
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai