जलसंवर्धन करणार्या गृहसंकुलांना मालमत्ता करात सवलत
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2022
- 558
पालिकेकडून प्रोत्साहन देण्याचा विचार ; पुढील आठवड्यात अंतिम निर्णय
नवी मुंबई : शहरात माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत असून या अंतर्गत महापालिका प्रशासन आपल्या विविध कार्यालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवत आहे. यात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी गृहसंकुलांत हा प्रकल्प राबवण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. हा प्रकल्प राबवणार्या गृहसंकुलांना प्रोत्साहन म्हणून महापालिका मालमत्ता करात सवलत देण्याचा विचार करीत आहे. याचे नियोजन सुरू असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिका माझी वसुंधरा अभियानअंतर्गत अनेक पर्यावरणपूरक प्रकल्प राबवत आहे. यात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रशासन नियोजन करीत आहे. नागरिकांचा जलसंवर्धनात सहभाग वाढला तर पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होईल या हेतून यात गृहसंकुलांचा सहभाग वाढवण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने या अभियानांतर्गत आपल्या कार्यालयांत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून याची कामे सुरू आहेत. घणसोली येथील महापालिका औषध भांडारगृह, महापालिका मुख्यालय, तसेच विभाग कार्यालये याठिकाणी हे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. आता नागरिकांनी यात सहभागी होऊन जलसंवर्धन करावे, असे आवाहन केले आहे. आपल्या गृहसंकुलात हा प्रकल्प राबवल्यास प्रोत्साहन म्हणून मालमत्ता करातही सूट देण्याचा विचार प्रशासन करीत आहे.
नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी गृहसंकुले पावसाच्या पाण्याची साठवणूक करून जलसंवर्धन करतील त्यांना मालमत्ता करात सवलत देण्याचे नियोजन सुरू आहे. पुढील आठवड्यात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai