नमुंमपा ग्रंथालयास ग्रंथ भेट व वृक्षारोपण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 05, 2022
- 680
नवी मुंबई ः स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 67 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील बँकेच्या शाखेमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ग्रंथालयास 200 पुस्तकांची ग्रंथभेट देण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे देशातील सर्वोत्तम स्मारक म्हणून नावाजले जात असून येथील ग्रंथालय ई-लायब्ररी सुविधेसह अद्ययावत आहे. या पुस्तक भेटीमुळे ग्रंथालयाच्या समृध्दीत भर पडणार आहे. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे समाज विकास विभाग उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, स्मारकाच्या सुविधा नियंत्रक संध्या अंबादे यांचेकडे बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक कपील गर्ग आणि नमुंमपा मुख्यालय शाखा व्यवस्थापक शामली आरस आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे बँकेच्या वतीने सेक्टर 21 नेरुळ येथील रॉक गार्ड़न मध्ये 240 देशी प्रजातींची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे उद्यान उप आयुक्त नितीन नार्वेकर, उद्यान अधिक्षक भालचंद्र गवळी, बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक कपील गर्ग व नमुंमपा मुख्यालय शाखा व्यवस्थापक शामली आरस उपस्थित होते. त्यांच्याहस्ते बकुळ, अनंत, कडुनिंब, करंज, बहावा अशी जैवविविधतेला पूरक देशी वृक्षरोपे लावण्यात आली. बॅकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत ग्रंथभेट व वृक्षारोपण यासारखे उपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया प्रशासनाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai