अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 09, 2022
- 805
शिंदे गटाच्या 9 तर भाजपच्या 9 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मुंबई ः गेल्या 40 दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. 18 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपकडून अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडूनही जुन्या मंत्र्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नाही.
शिंदे गटाचे 9 आणि भाजपाचे 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात अपक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. पुढील विस्तारात या अपक्षांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. तसेच मंत्रिमंडळात एकाही महिलेचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे पुरुषप्रधान मंत्रिमंडळ असल्याची चर्चा रंगली आहे.
शिंदे गटाचे मंत्री
- दीपक केसरकर
- गुलाबराव पाटील
- उदय सामंत
- अब्दुल सत्तार
- संदीपान भुमरे
- दादा भुसे
- शंभुराज देसाई
- तानाजी सावंत
- संजय राठोड
भाजप गटाचे मंत्री
- चंद्रकांत पाटील
- सुधीर मुनगंटीवार
- गिरीश महाजन
- मंगलप्रभात लोढा
- राधाकृष्ण विखे पाटील
- सुरेश खाडे
- विजय कुमार गावित
- अतुल सावे
- रवींद्र चव्हाण
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai