कर्नाळा पक्षी अभयारण्यात वन्यजीव सप्ताह
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2022
- 660
विविध शाळेत आणि आदिवासी वाड्यांवर जनजागृती कार्यक्रम
उरण ः वन्यजीवांच्या संरक्षणाकरिता, संवर्धनाकरिता 01 ऑक्टोबर ते 07 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. आणि ह्याच निमित्ताने ठाणे वनविभाग, कर्नाळा पक्षी अभयारण्य, उरण वनविभाग आणि कर्जत पूर्व वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आदीवाडी वाड्यामध्ये राजू मुंबईकर यांच्यां साप समज आणि गैरसमज व विविध प्राणी आणि पक्षी या बद्दलची उपयुक्त माहिती देणारे व्याख्यानरुपी प्रबोधनात्मककार्यक्रमा द्वारे जनजागृती करण्यात आली.
कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या माध्यमातून वन्यजीव सप्ताह निमित्त उरण-पनवेल,कर्जत तालुक्यातील शाळांत आणि विविध आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवामध्ये ह्या जंगल संपत्ती बद्दल वन्यजीवांप्रति जनजागृती निर्माण व्हावी या करिता सात दिवसांचा जनजागृती कार्यक्रम करण्यात आला. यात कर्जत पूर्व प्राथमिक शाळा, आपटा प्राथमिक शाळा, जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल इंग्लिश मिडियम स्कूल वेश्वि, पी.पी.खारपाटील इंग्लिश मिडियम स्कूल चिरनेर, रानसई प्राथमिक शाळा,अ क्कुलवाडी आदिवासीवाडी, पोसरी आदिवासीवाडी या सर्व ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. लुप्त होत चाललेल्या प्राणी पक्षांचं रक्षण आणि संवर्धन करणं काळाची गरज आहे हे समजावून सांगितलं सोबतच त्यांच्या आजूबाजूलाच असणार्या विविध पक्षी, प्राण्यांची माहिती देत सर्व शालेय विद्यार्थ्यांची आणि त्या आदिवासी बांधवाची उत्सुकता वाढविली. ह्या कार्यक्रमा दरम्यान प्रत्येक आदिवासी वाडीवरील लहान चिमुकल्यानां बिस्किटांच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित ह्या कार्यक्रमा करिता प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी आपल्या साप समज आणि गैरसमज ह्या व्याख्यानरुपी प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे सर्व शालेय विद्यार्थी वर्गाचे आणि आदिवासी बांधवांचे प्रबोधन केले. ह्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक एन.डी.राठोड, प्रदीप चव्हाण, व्ही.एम.म्हात्रे (उरण वनविभाग अधिकारी), एम.बी.इंगोले(उरण वनविभाग), एन.टी.भिषे (उरण वनविभाग),राजेंद्र पवार (उरण वनविभाग)शितल पाटील (उरण वनविभाग), सुप्रिया कसबे (उरण वनविभाग), कर्नाळा पक्षी अभयारण्य वन विभागातील अधिकारी वर्ग एस.एस.पवार (वनपाल आपटा), तुकाराम जाधव (वनरक्षक), भुपेंद्र वारगे (वनरक्षक)आणि अनिल घरत उपस्थितीत होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai