बीओटी तत्वावर होणार एपीएमसीचा पुनर्विकास
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 28, 2022
- 589
सल्लागार नेमुन करणार पाचही बाजारांची पुनर्बांधणी
नवी मुंबई ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील इमारती धोकादायक झाल्या आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी एपीएमसी संचालक मंडळाने सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. कांदा -बटाटा बाजारासह चारही बाजार समितींचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बाजार समितीच्या घटकांसमोर पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण मांडण्यात येणार असून सर्वांच्या मंजुरीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
सन 1982 मध्ये कांदा बटाटा बाजार इमारतीची उभारणी करण्यात आली. 2005 पासून या इमारती नवी मुंबई महानगरपालिकेच्या धोकादायक यादीत समाविष्ट झाले. मात्र प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वादामुळे इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम रखडले आहे. एपीएमसी प्रशासनाकडे पुनर्विकास करण्यासाठी आर्थिक ऐपत नसल्याने तसेच कांदा-बटाटा बाजारासह फळे, भाजीपाला, अन्नधान्य आणि मसाला या पाचही बाजार समितींचा पुनर्विकास एकत्रितपणे करण्याचा निर्णय झाला आहे. हा पुनर्विकास करण्यासाठी संचालक मंडळाच्या वतीने सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याच्या मार्फत बाजार घटकांसमोर पुनर्विकासाचे सादरीकरण केले जाईल आणि बाजार घटकांच्या समंतीनंतरच यापुनर्विकास कामाला अंतिम मंजुरी देण्यात येईल.
- पुनर्विकास करताना आगामी 50-100 वर्षांचा विचार करुन अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त बाजाराची उभारणी करण्याचे नियोजन आहे. सल्लागाराक्डून येेत्या दोन-तीन महिन्यात आराखडा तयार करुन घेण्यात येणार असल्याने एपीएमसी बाजार समितीतील पुनर्विकास लवकरच आकार घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
- सल्लागारामुळे बाजाराची आधुनिक पद्धतीची बांधणी केली जाईल अशा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai