Breaking News
पावसाळी वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात, हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत मुंबईजवळील शहापूरमधल्या धसई गावात..सगळीकडे ढोल ताशांचा गजरात दहीहंडी उत्सव साजरा केला जात होता. खरंतर दहीहंडीला अवकाश असतांना वेळेच्या आधी हा उत्सव कसा साजरा होतोय असं वाटत असतांना... मुला - मुलींचा घोळका अचानक नाचता नाचता थांबला... कालांतराने कळाले की, तिथे ओ थ्री शॉपिंग निर्मित, साज इंटरनेटमेंट सहनिर्मित, अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या मराठी सिनेमाचे चित्रीकरण सुरु होते.
झील पाटील, दुष्यंत वाघ, अनिकेत केळकर या कलाकारांवर हे दही हंडीचे गाणे चित्रित होत होते. दिग्दर्शक अखिल देसाई सांगतात की, शिष्यवृत्ती हा सिनेमा शाळेभोवती फिरतो. या सिनेमातल्या व्यक्तिरेखा माझ्या खर्या आयुष्यातून आल्या आहेत. ही 90च्या दशकातली गोष्ट आहे, एक शिक्षक आणि त्यांच्या शिष्याची. यातला गावडे शिक्षक शिस्तप्रिय असला तरी तो मुलांना शिक्षा न देता प्रेमाने समजावून सांगणारा आहे. गावातील एका हुशार मुलाकडे गुणवत्ता आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेतांना अडचणी येत आहेत, त्यासाठी हा शिक्षक त्याला मदत करत असतो. सिनेमाच्या शीर्षकाबद्दल ते सांगतात की, शिष्य आणि त्याची वृत्ती असा देखील अर्थ होतो आणि शिष्यवृत्ती असा देखील त्याचा अर्थ होतो.. नेमका कुणाला कोणता अर्थ घ्यायचा तो प्रेक्षकांनी सिनेमा बघून ठरवावे. दुष्यंत वाघ सांगतो की, मी आज दहीहंडी उत्सवात सामील झालोय, याचे कारण म्हणजे सिनेमातल्या गोष्टीमध्ये गावात दहीहंडीचा उत्सव आहे, ज्यात मला गावातील शिक्षक म्हणून बोलावण्यात आलं आहे. प्रशांत गावडे या शिक्षकाची भूमिका मी साकारतो आहे. मुलांना फक्त मारणं या विचारांचा तो नाही आहे. खूप संवेदनशील आहे, मुलांमध्ये खूप मिळून मिसळून शिकवणारा तो आहे. दुष्यंत खोडकर असला तरी शिस्तप्रिय गावडे सर साकारताना मला माझ्यात अनेक बदल करावे लागले. स्मिता पाटीलची भाची म्हणून चर्चेत असलेली झिल या सिनेमातून पदार्पण करत आहे. लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai