13 हजार विद्युत खांबांचे सक्षमीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 18, 2023
- 551
जुने खांब बदलून 25 वर्ष आयुर्मान असणारे जीआयचे नवीन खांब बसवणार
नवी मुंबई ः नवी मुंबई विकसीत करताना सिडकोमार्फत करण्यात आलेल्या दिवाबत्तीमध्ये असलेले विद्युत खांब हे एमएस धातुचे असून त्याचे आयुर्मान सीपीडब्ल्युडी च्या निकषानुसार साधारणत: 20 वर्षे होते. त्यामुळे ते खांब आता जीर्ण झाल्याने पालिकेकडून ते बदलण्यात येत आहेत. 17 हजार खांब बदलण्यात येणार असून त्यापैकी 13 हजार खांब बसवून झाले आहेत. 25 वर्ष आयुर्मान असणाऱ्या या जीआय विद्युत खांबांमुळे नवी मुंबईतील दिवाबत्ती व्यवस्थेचे सक्षमीकरण होणार आहे.
सन 1970 मध्ये सिडकोने विकसित केलेल्या नवी मुंबई शहरातील विविध नोडमधील दिवाबत्तीची व्यवस्था 1998 पासून टप्प्याटप्प्याने नवी मुंबई पालिकेकडे सिडकोमार्फत हस्तांतर झाली आहे. तर 2005 मध्ये एमआयडीसीमार्फत औद्योगिक क्षेत्रातील दिवाबत्ती व्यवस्था महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आली होती. त्यामुळे हस्तांतरित झालेल्या दिवाबत्तीचे विद्युत खांबांचे मात्र आयुर्मान सीपीडब्ल्यूडीच्या निकषानुसार संपले असल्याने अनेकदा अपघाताच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे गंजलेले लोखंडी विद्युत खांब बदलण्यासाठी पालिका प्रशासनानाचे पुढाकार घेतला आहे.
- आयुर्मान 25 वर्षे
या प्रस्तावानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असलेल्या 31 हजार विद्युत खांबांपैकी 5 हजार विद्युत खांब वेळोवेळी विविध कारणांसाठी बदलण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित 17 हजार खराब झालेले विद्युत खांब बदलण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला. या प्रस्तावानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व विद्युत खाबांचे त्रयस्थ पक्षामार्फत पर्यवेक्षण करण्यात आले. तसेच 17 हजारांपैकी साधारणत: 13 हजार खराब झालेले लोखंडी विद्युत खांब बदलण्यात आले आहेत. त्याठिकाणी जास्त आयुर्मान असलेले जीआयचे अष्टकोनी विद्युत खांब लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे सीपीडब्ल्यूडीच्या निकषाप्रमाणे त्यांचे आयुर्मान साधारणत: 25 वर्षे झाले आहे. - खांबांसाठी सिमेंट काँक्रीटचा पाया
सिडको व एमआयडीसीमार्फत बसवण्यात आलेले लोखंडाचे विद्युत खांब हे जमिनीत खड्डा खोदून बसवण्यात आले आहेत. ते खराब होण्याचे प्रमाण अधिक होते. नवी मुंबई महापालिकेने नवीन जीआयचे विद्युत खांब बसवताना याची विशेष काळजी घेत, सिमेंट काँक्रीटचा चौकोनी पाया बनवून त्यावर मेटल स्क्रूने हे नवीन खांब बसवलेले आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी वारंवार रस्त्यांचे खोदकाम करण्याची वेळ येणार नाही. तसेच केबलचे आयुर्मानही साधारणत: 20 वर्षे असल्यामुळे यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai