विद्यार्थ्यांनी प्रसारित केला जलबचतीचा संदेश
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2023
- 487
नवी मुंबई ः जलजागृती सप्ताहाचे 16 ते 22 मार्च 2023 या कालावधीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. आयुक्तांमार्फत नागरिकांना जलबचतीचे आवाहन करण्यात आले. पालिकेच्या सर्व 79 शाळांमध्ये जलबचत विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होवून 35 हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी चित्र, रांगोळी, निंबध, वक्तृत्व अशा विविध माध्यमतून जलबचतीचा संदेश दिला.
पाण्याचे महत्व विदयार्थ्यांना लहान वयापासूनच कळावे याकरिता पालिकेच्या सर्व 79 शाळांमध्ये जलबचत विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या 56 प्राथमिक व 23 माध्यमिक शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी आकर्षक हस्तफलक तयार करून त्यावर जलबचतीचे संदेश रेखाटले. काही शाळांमध्ये पाण्याचे महत्व पटवून देणाऱ्या विषयांवर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. विदयार्थ्यांवर जलबचतीचे संस्कार करण्यासोबतच पालकसभा घेऊन पाणी बचतीचा संदेश प्रसारित करण्यात आला.
अनेक शाळांनी आपापल्या परिसरात जलजागृती करणाऱ्या प्रभातफेऱ्या काढून ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा' अशा विविध प्रकारच्या घोषणा देत जनसामान्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले. काही शाळांमध्ये पाणी बचतीवर भाषणे तर दोन शाळांमध्ये पारंपारिक कीर्तनेही सादर झाली. काही शाळांनी आपल्या परिसरातील मुख्य रस्त्यांवर तसेच मुख्य चौकांमध्ये जलजागृतीपर पथनाटये सादर केली. सर्वच्या सर्व 79 शाळांमधील वर्गावर्गामध्ये पाणीबचतीची सामुहिक जलप्रतिज्ञा घेण्यात आली. प्रतिज्ञेनंतर शिक्षकांनी विदयार्थ्यांना पाण्याचे महत्व सांगत पाण्याचा उपव्यय टाळणे, पाणी बचत याविषयी सविस्तर माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळेतील कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी तसेच 35 हजारहून अधिक मुलांनी एकत्र येत जलबचतीचे महत्व अधोरेखित केले व जलबचत सप्ताह उत्साहात साजरा केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai