कामगार दिनी स्वच्छताकर्मींचा सन्मान
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2023
- 264
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून उत्तम काम करणाऱ्या कामगारांना 10 स्वच्छताकर्मींना सन्मानीत करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करीत राष्ट्रगीत व तद्नंतर 19 फेब्रुवारी 2023 पासून महाराष्ट्र शासनाने अंगीकृत केलेले महाराष्ट्राचे राज्यगीत ध्वनीप्रसारित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे तसेच विभागप्रमुख, अधिकारी कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कामगार दिनी नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांत उत्तम काम करणाऱ्या कामगारांना सन्मानीत केले जाते. त्यानुसार जेथील स्वच्छतेचे नागरिकांप्रमाणेच देशीपरदेशी अभ्यागतांकडूनही कौतुक केले जाते अशा आयकॉनिक महानगरपालिका मुख्यालय इमारतीची अतिशय उत्तम स्वच्छता राखणाऱ्या 10 स्वच्छताकर्मींना प्रातिनिधीक स्वरूपात आयुक्त महोदय यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. यामध्ये, प्रगती कोळी, सारिका म्हात्रे, राजेश्री दिघे, छाया कडबे, दर्शना मोरे, गणेश मोरे, सुरज पाटील, मुख्तार शेख, हितेश लोंढे, मिथुन पाटील या स्वच्छताकर्मींचा सन्मान झाला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीस 30 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत विद्युत रोषणाई करण्यात आली असून मुख्यालय इमारतीसमोर हुतात्मा चौकाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. ती बघण्यासाठी व विद्युत रोषणाई आणि प्रतिकृतीसमवेत सेल्फी काढण्यासाठी नागरिक या परिसराला मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai